Goa Dengue Cases Dainik Gomantak
गोवा

चतुर्थीनिमित्त बार्देशमध्ये गटस्तरीय बैठक; उत्‍सव डेंग्यूमुक्त करण्याचे उपजिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

डासांना आळा घालणे हा एकमेव उपाय; बैठकीत चर्चा

दैनिक गोमन्तक

Goa Dengue Cases: कीटकजन्य आजारांचा धोका टाळून डासांची पैदासकेंद्रे नष्ट करणे, यासाठी तालुक्यातील अचूक डेटा संकलित करणे अत्यावश्यक आहे. कारण वाढती बांधकामांची संख्या, तेथील कामगारांची स्थिती, कंत्राटदार-उपकंत्राटदारांच्या डेटा यांचा प्रामुख्याने अभाव दिसतो.

तसेच ग्रामीण स्वच्छता व पोषण समिती, कचरा व्यवस्थापन समिती, तसेच गाव जलस्वच्छता समित्यांनी सक्रिय होऊन आपापल्या पंचायतींमध्ये ‘कीटकजन्य आजारांचा धोका’ या विषयावर बैठका घेण्यास सुरूवात करावी, असे निर्देश उपजिल्हाधिकाऱ्यांनी बार्देश गटस्तरीय समितीच्या बैठकीत दिले. तोंडावर येऊन पोचलेला गणेश चतुर्थी उत्‍सव डेंग्‍यूमुक्त करण्‍याचा संदेश त्‍यांनी दिला.

डेंग्यूचा डास हा दिवसा सक्रिय असतो. त्यामुळे डासांना आळा घालणे हा एकमेव उपाय या रोगाला प्रसरण्यापासून रोखू शकतो. यंदाचा गणेश चतुर्थी उत्‍सव डेंग्यूमुक्त असावा हा संदेश आजच्या बैठकीतून देण्‍यात आला.

त्यासाठी लोकांनी आपापल्‍या घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा, पाणी साचू न देणे अशा गोष्टींनी डासांना प्रतिबंध करू शकतो, असे बैठकीत सांगण्यात आले. तसेच नोडल अधिकाऱ्यांनी सक्रिय होऊन प्रभागांमध्‍ये सरप्राईझ भेट देऊन स्‍वच्‍छतेवर भर द्यावा, असेही ‘गोवा कॅन’चे रोलंड मार्टिन्स यांनी सुचविले.

या बैठकीला बार्देश उपजिल्हाधिकारी गुरुदास देसाई, मामलेदार प्रवीण गावस, गोवा कॅनचे समन्वयक रोलंड मार्टिन्स, म्हापसा आरोग्यधिकारी डॉ. शॅरल डिसोझा, शिवोलीच्या आरोग्यधिकारी डॉ. साधना शेट्ये, कोलवाळ, हळदोणा, पर्वरी या आरोग्यकेंद्रांचे प्रतिनिधी उपस्‍थित होते.

बहुतांश वेळा डासांनी सकाळच्‍या वेळी चावा घेतल्‍यास डेंग्यू होतो. अनेकजण कामानिमित्त शहराबाहेर जातात व तेथून हा आजार घेऊन म्हापशात परतात. त्यामुळे सकाळच्या वेळी लोकांनी कुठली खबरदारी घ्यावी, याबाबत जागृती झाली पाहिजे. आरोग्यदिन प्रत्येक प्रभागात पाळून या कार्यक्रमांना स्थानिक नगरसेवकांनी उपस्‍थिती लावावी, असे यावेळी सुचविण्‍यात आले.

ऑक्‍टोबरमध्‍ये पंचायतींच्‍या विशेष ग्रामसभा

  • ऑक्टोबरमध्ये पंचायतींच्‍या विशेष ग्रामसभा होणार आहेत. या ग्रामसभांमध्‍ये ‘कीटकजन्य रोगांचा धोका’ या विषयावर चर्चा व्हावी, असे निर्देश बीडीओंकडून पंचायतींना दिले जातील.

  • बार्देशातील नागरी तसेच इतर प्राथमिक आरोग्यकेंद्रांच्या हद्दीत मागील चार महिन्यांत मलेरियाचे रुग्ण आढळले. त्‍यात म्हापशात १७, शिवोलीत १३ व कोलवाळमधील २५ रुग्णांचा समावेश आहे.

  • सर्वाधिक १३३ बांधकाम साईट्स शिवोली प्राथमिक आरोग्यकेंद्राच्या हद्दीत आहेत. म्हापशात ५२, पर्वरीत ३८, कोलवाळ ४० तर हळदोणेत ४२ बांधकाम साईट्स आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pankaj Dheer: महाभारतातील 'कर्ण' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांचे निधन, मनोरंजन विश्वात शोककळा

‘त्या’ स्वप्नाला मूर्त स्वरुप येण्यापूर्वीच 'पात्रांव रवी नाईक' यांनी जगाचा निरोप घेतला

'चाणक्य हरपला'! फोंड्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार; माजी मुख्यमंत्र्यांच्या निधनाने सर्वपक्षीय नेत्यांमध्ये शोककळा

Goa Today's News Live: सार्वजनिक सुट्टीमुळे दावर्ली पंचायत निवडणूक रद्द, उडाला गोंधळ

Footprints and Frames: मुंबई ते गोवा मार्गावरील कथा पहा चित्रांमध्ये! नॉस्टेल्जीयाच्या पाऊलखुणा

SCROLL FOR NEXT