Grassroots Workers Are Soul Of Congress Moreno Rebello Dainik Gomantak
गोवा

Congress Workers: ‘तळागाळातील कार्यकर्तेच काँग्रेसचा आत्मा, गोमंतकीयांच्या भल्यासाठी...’- मोरेनो रिबेलो

Moreno Rebello: तळागाळातील कार्यकर्त्यांची निष्ठा, समर्पण, मेहनत, बांधिलकी यामुळेच काँग्रेस पक्षाला भूतकाळातील राजकीय उलथापलथींवर यशस्वीपणे मात करण्यात मदत झाली आहे.

Manish Jadhav

Grassroots Workers Are Soul Of Congress Moreno Rebello: तळागाळातील कार्यकर्ता हाच काँग्रेस पक्षाचा आत्मा आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांची निष्ठा, समर्पण, मेहनत, बांधिलकी यामुळेच काँग्रेस पक्षाला भूतकाळातील राजकीय उलथापलथींवर यशस्वीपणे मात करण्यात मदत झाली आहे. गोवा आणि गोमंतकीयांच्या भल्यासाठी काँग्रेस नेहमीच दिशादर्शक म्हणूनच अग्रेसर राहणार आहे, असे काँग्रेसचे सरचिटणीस मोरेनो रिबेलो यांनी म्हटले आहे.

काँग्रेस (Congress) पक्षाची जागा कोणीही घेऊ शकत नाही. स्वातंत्र्यलढ्यापासून भारताला 21व्या शतकात नेण्यापर्यंत कॉंग्रेसने योगदान दिले आहे. आमच्या सर्व दूरदर्शी नेत्यांनी राष्ट्र उभारणीत योगदान दिले आहे. आपल्या सुंदर गोव्याला पुढे घेऊन जाण्यासाठी काँग्रेस आपले योगदान देत राहील, असेही मोरेनो रिबेलो यांनी नमूद केले.

रिबेलो पुढे म्हणाले की, कधीकधी काही कारणांमुळे काही निर्णय घ्यावे लागतात. परंतु याचा अर्थ असा नाही की, आपण पक्षाची विचारधारेला बगल दिली आहे. काँग्रेस पक्षाची मूल्ये माझ्यासारख्या तळागाळातील कार्यकर्त्यांना समृद्ध करतात, असे रिबेलो म्हणाले.

गोव्यातील (Goa) अनेक नेत्यांनी काँग्रेस पक्षाकडून राजकारणाचे धडे घेतले. आज ते विविध पक्षांमध्ये आहेत. आमचे कार्यकर्ते काँग्रेसच्या विचारधारेशी कटिबद्ध राहिले आणि त्यामुळेच कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांना कॉ्ग्रेसचा घात करुन पक्षांतर करणाऱ्यांच्या मतदारसंघात भरघोस मते मिळू शकली, असा टोला मोरेनो रिबेलो यांनी हाणला.

मी सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांना एकजूट ठेवून एकसंघ राहण्याचे आवाहन करतो. काँग्रेस पक्षाचे भविष्य उज्ज्वल आहे. इंडिया ब्लॉकचे नेतृत्व राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस पक्ष करत आहे आणि काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावनांचा आमच्या राष्ट्रीय आणि राज्यातील नेत्यांकडून नेहमीच आदर केला जाईल, असा दावा मोरेनो रिबेलो यांनी केला.

काही स्वार्थी घटक बेजबाबदार विधाने करुन काँग्रेस पक्षाचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी आपला छुपा राजकीय अजेंडा साध्य करण्यासाठी काँग्रेस पक्षाला नगण्य लेखण्याचा प्रयत्न करु नये. आघाडी राजकारण धर्म पाळताना सर्वांनी एकमेकांच्या सामर्थ्याचा आणि कमकुवतपणाचा आदर करणे आवश्यक आहे, असे रिबेलो शेवटी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

Viral Video: बर्फाचा डोंगर घेऊन निघाला...! स्कूटी चालकाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून नेटिझन्सही हैराण; तुम्ही पाहिलाय का?

Anant Chaturdashi 2025 Wishes In Marathi: बाप्पा चालले आपल्या गावाला! अनंत चर्तुदशीनिमित्त नातेवाईकांना शेअर करा 'हे' खास WhatsApp Status

बिट्स पिलानीत 20 वर्षीय विद्यार्थ्याने आयुष्य का संपवले? समोर आले कारण Watch Video

Fake IAS Officer: मुख्यमंत्री-राज्यपालांसोबत फोटो, यूपी-बिहार ते गोवापर्यंत पसरले नेटवर्क, कोट्यवधींचा घातला गंडा; बनावट आयएएस अधिकाऱ्याचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT