Gozo Karnataka Cabs Dainik Gomantak
गोवा

Goa Taxi: कर्नाटकातील ‘गोझो कॅब्स’ टॅक्सी गोव्यात? टॅक्‍सीमालकचा आरोप; कठोर कारवाईची मागणी

Gozo Cabs: कर्नाटकातून चालवल्या जाणाऱ्या ‘गोझो कॅब्स्’ या ॲपबेस टॅक्सी तथा प्रवासी वाहतूक वाहने राज्यात राजरोसपणे व्यवसाय करीत असल्याचा आरोप गोवा टॅक्‍सीमालक संघटनेचे पदाधिकारी ​यांनी केला आहे.

Sameer Panditrao

पणजी: कर्नाटकातून चालवल्या जाणाऱ्या ‘गोझो कॅब्स्’ या ॲपबेस टॅक्सी तथा प्रवासी वाहतूक वाहने राज्यात राजरोसपणे व्यवसाय करीत असल्याचा आरोप गोवा टॅक्‍सीमालक संघटनेचे पदाधिकारी ​योगेश गोवेकर यांनी केला आहे. त्यांनी सरकारने या प्रकाराची तातडीने दखल घ्यावी, असे आवाहन केले आहे.

गोवेकर यांनी निदर्शनास आणून दिले की, ‘गोझ’सारखे अ‍ॅप - आधारित ऑपरेटर गोव्यातील पारंपरिक टॅक्सीचालकांच्या उपजीविकेवर परिणाम करत आहेत. ‘गोझो कॅब्स’ याचे मुख्यालय कोलकातामध्ये आहे आणि त्यांची सेवा देशभर आहे, परंतु भाडे घेऊन आलेल्या वाहनधारकाने प्रवासी सोडून परत जायला हवे. मात्र, ते तसे न करता येथून कमी दरात परतीचे भाडे घेऊन जातात.

आम्ही सरकारला हस्तक्षेप करून हा व्यवसाय सुरळीत आणि सुनिश्चित करण्यासाठी आणि स्थानिक ऑपरेटर्सना संरक्षण देण्यासाठी अशा बेकायदेशीर प्रवासी कॅब्स सेवांवर कठोर कारवाई करावी.

मुख्यमंत्री, वाहतूक संचालनालय, आरटीओ, सायबर सेलने याविषयी दखल घ्यावी आणि अशा बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या कॅब्सवर बंदी घालावी. यापूर्वी महाराष्ट्रातील सवेरा टॅक्सी, तसेच ‘उबेर’च्याही टॅक्सी आल्या होत्या. परंतु अशा सेवांना खासगी टॅक्सीमालकांनी कडाडून विरोध केल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.

‘अ‍ॅप-आधारित टॅक्सींना आळा घाला’

कथित बेकायदेशीर आणि अन्याय्य कारवायांबद्दल ​​योगेश गोवेकर यांनी सरकारला प्रश्न विचारला आहे. गोवेकर यांनी निदर्शनास आणून दिले की ‘गोझो’सारखे अ‍ॅप-आधारित ऑपरेटर पारंपरिक टॅक्सीचालकांच्या उपजीविकेवर परिणाम करत असल्याने ते निश्चित धोकादायक आहे. सरकारने टॅक्सी धोरण तयार करताना या प्रकरणावर आळा घालणाऱ्या नियमांचा समावेश करावा, अशी विनंतीही सरकारला केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT