Goa politics update Dainik Gomantak
गोवा

Govind Gaude: "निर्णय दिल्लीत होणार..." भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचे गावडेंबाबत स्पष्टीकरण

Damu Naik on Govind Gaude: दामू नाईक यांनी सध्या कार्यरत राज्य समिती नसल्यामुळे राज्य स्तरावर कोणताही निर्णय घेता येणार नाही असे स्पष्ट केले

Akshata Chhatre

पणजी: गोवा भाजपमध्ये सध्या 'आदिवासी कल्याण' विभागातील कथित लाचखोरीच्या आरोपावरून जोरदार राजकीय खळबळ उडाली आहे. या वादाच्या केंद्रस्थानी असलेले मंत्री गोविंद गावडे यांच्या वादग्रस्त विधानांनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सोमवारी (दि.२) त्यांच्यासोबत एक महत्त्वाची बैठक घेतली.

दिल्लीतून होणार अंतिम निर्णय

गावडे यांच्या स्पष्टीकरणानंतर, दामू नाईक यांनी सध्या कार्यरत राज्य समिती नसल्यामुळे राज्य स्तरावर कोणताही निर्णय घेता येणार नाही, असे स्पष्ट केले. या प्रकरणाचा सविस्तर अहवाल पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला दिल्लीला पाठवला जाईल, आणि तेच यावर अंतिम निर्णय घेतील, असे नाईक यांनी सांगितले. या घडामोडींमुळे भाजपमध्ये अंतर्गत वादळ निर्माण झाल्याचे चित्र आहे, आणि दिल्ली दरबारातून आता काय निर्णय येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गावडे यांचे वादग्रस्त विधान आणि त्यानंतरची बैठक

मंत्री गोविंद गावडे यांनी नुकतेच आदिवासी कल्याण विभागात लाचखोरी होत असल्याचे सूचित करणारे वादग्रस्त विधान केले होते. या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली होती.

या पार्श्वभूमीवर, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी तातडीने गावडे यांच्यासोबत बैठक घेऊन या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली.

या बैठकीत गावडे यांनी आपले स्पष्टीकरण दिले असले तरी, दामू नाईक यांनी राज्य स्तरावर निर्णय घेण्यास असमर्थता व्यक्त केली. सध्या भाजपची गोवा राज्य समिती पूर्ण क्षमतेने कार्यरत नसल्यामुळे, असे महत्त्वाचे आणि संवेदनशील निर्णय घेणे शक्य नसल्याचे नाईक यांनी नमूद केले.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पक्षाचे केंद्रीय नेतृत्व आता यावर काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मंत्री गावडे यांच्या विधानाचे पक्षाच्या प्रतिमेवर काय परिणाम होतात आणि या वादातून भाजप कसा मार्ग काढतो, हे आगामी काळात स्पष्ट होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: गजपती राजू यांनी गोव्याचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली

Ashok Gajapathi Raju: 17 वर्षे मंत्रिपद, 7 वेळा आमदार, एकदा खासदारकी भूषवलेले व्यक्तिमत्व; गोव्याचे 20 वे राज्यपाल अशोक गजपती राजू

POP Ganesh Idol Ban: पीओपी गणेशमूर्तींवर बंदी, पण कारवाईचे काय?

Kadamba Velankanni Bus: तामिळनाडूतील वालंकणीसाठी कदंबाच्या विशेष बसगाड्या! कुठून सुटणार गाड्या, काय असणार तारीख जाणून घ्या..

Shravan Shanivar: श्रावण शनिवारचा दुर्मिळ योग! साडेसातीचा त्रास मिटेल; अश्वत्थ मारुतीचे व्रत कसे करावे? वाचा

SCROLL FOR NEXT