शिवसेना  Dainik Gomantak
गोवा

'सरकारने शिवचरित्र घरोघरी पोहोचवावे'

जितेश कामत: शिवसेनेतर्फे म्हापशात मान्यवरांचा सत्कार

दैनिक गोमन्तक

म्हापसा: छत्रपती शिवाजी महाराजांचे घरोघरी निरंतर स्मरण होण्यासाठी सरकारने शिवचरित्रावर आधारित उपक्रम राबवावेत, जेणेकरून शिवाजी महाराजांचे चरित्र व त्यांचा तेजस्वी पराक्रम मुलांच्या मनामनांत जिवंत राहील, असे मत शिवसेना गोवा राज्यप्रमुख जितेश कामत यांनी व्यक्त केले. या वेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

म्हापशातील शिवप्रेमी तथा ज्येष्ठ शिवसैनिक श्रीकांत सिमेपुरुषकर यांच्या पुढाकाराने शिवसेनेतर्फे म्हापसा येथील टॅक्सीस्थानकावर आयोजित केलेल्या शिवजयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक सुधीर कांदोळकर, गोवा मंदिर महासंघाचे अध्यक्ष भाई पंडित, बोडगेश्वर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संजय बर्डे, शिवसेना उपराज्यप्रमुख सुभाष केरकर, आनंद आमोणकर, मंदार पार्सेकर व दीपेश नाईक उपस्थित होते.प्रारंभी छत्रपतींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. पांडुरंग शिरोडकर यांनी गीत सादर केले.

‘हे’ पाच जण आहेत सत्‍कारमूर्ती

या कार्यक्रमात म्हापसा येथील सारस्वत विद्यालय संस्थेच्या काकुलो महाविद्यालयाचे अध्यापक जनार्दन ताम्हणकर, पद्मनाभ संप्रदायाचे किटला-साल्वादोर द मुन्द येथील प्रचारक सुभाष साळगावकर, खासगी बसमालक संघटनेचे अध्यक्ष सुदीप ताम्हणकर, मोपा विमानतळ संघर्ष समितीचे कार्यकर्ता नारायण गडेकर व सुकूर-पर्वरी येथील नाट्यकलाकार रामा साळगावकर यांचा सत्कार करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: झाड पडलेल्या घराची वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT