जांबावलीत आज प्रसिद्ध गुलालोत्‍सव

जय्‍यत तयारी: भाविकांचा सागर लोटणार, दामबाबवर गुलाल उधळणार
Famous Gulalotsav today in Zambaulim
Famous Gulalotsav today in ZambaulimDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे मर्यादित स्वरूपात साजरा करण्यात आलेला जांबावलीचा प्रसिद्ध गुलालोत्सव यंदा महामारी आटोक्‍यात आल्‍याने धूमधड्याक्यात साजरा करण्याचा निर्णय मठग्रामस्थ हिंदू सभा व श्री रामनाथ दामोदर देवस्थान समितीने घेतला आहे. जाबांवलीच्या शिमगोत्सवाला गेल्‍या बुधवारपासून प्रारंभ झाला आहे. गेले सहा दिवस अनेक धार्मिक विधी व सांस्कृतिक कार्यक्रम शेकडो भक्तांच्या उपस्थितीत पार पडले. उद्या मंगळवार दि. 29 मार्च रोजी शिमगोत्सवाचा प्रमुख व महत्त्‍वाचा दिवस असून दुपारी 3.30 वाजता श्री रामनाथ देवस्‍थानच्‍या प्रांगणात गुलालोत्सवाला होणार आहे.

Famous Gulalotsav today in Zambaulim
पणजी शिगमोत्सव: आडपई-आगापूरचे रोमटामेळ पथक पहिले

या गुलालोत्सवाला भाविकांचा महासागर लोटणार आहे. त्यामुळे आयोजक मठग्रामस्थ हिंदू सभेने सर्व जय्‍यत तयारी केली आहे. शिवाय केपे पोलिस स्‍थानकाने वाहतुकीत शिस्त राखण्यासाठी सर्व ती खबरदारी घेतली आहे. उद्या पहाटे श्री दामोदराची पालखी श्री रामनाथ मंदिराच्या प्रांगणात आणून ठेवली जाईल. दुपारी गुलालोत्सवा झाल्‍यानंतर ती परत मंदिराकडे प्रयाण करील. श्री दामोदर देवावर गुलाल उधळल्याशिवाय भक्तांनी गुलालोत्सवाला आरंभ करू नये व शिस्त पाळून श्रींचे दर्शन घ्यावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्‍यात आले आहे.

गुलालोत्सवानंतर रात्री 11 वाजता नवदेवाची वरात कार्यक्रम व 12 वाजता संगीत सभा होईल. सकाळी धुळपेटीने उत्सवाची सांगता होणार आहे.गुलालोत्‍सवानिमित्त जांबावलीत पोलिस आऊट पोस्ट सुरू करण्यात आले आहे. उद्या तेथे केपेसह कुंकळ्ळी, कुडचडे, मडगाव येथील पोलिस कुमक बोलाविण्यात आली आहे.

Famous Gulalotsav today in Zambaulim
फोंडा तालुक्यातील तीन आमदारांना मंत्रिमंडळात स्थान

बंदोबस्‍तासाठी 400 पोलिसांची फौज

गुलालोत्‍सवानिमित्त जांबावली व परिसरात तब्‍बल 400 पोलिस तैनात करण्‍यात येणार आहेत. केपेचे पोलिस निरीक्षक दीपक पेडणेकर यांनी सांगितले की, वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी सर्व उपाययोजना आखण्‍यात आली आहे.

श्री दामोदर मंदिराबाहेर थाटली जाणारी दुकाने आता तेथून दूर ठिकाणी हलविण्यात आली आहेत. त्यामुळे गुलालोत्सवाबरोबरच पार्किंगलाही पुरेशी जागा उपलब्ध होणार आहे. पाकिटमार व इतर वाईट प्रवृत्तीच्या लोकांवर नजर ठेवण्यासाठी खास पोलिस तैनात करण्यात आले आहेत. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणूनही पोलिस तत्पर राहणार आहेत. तसेच अशा घटना घडविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्‍यात येणार आहे, असेही त्‍यांनी सांगितले. या सर्व व्यवस्थेवर पोलिस अधिकारी संतोष देसाई लक्ष ठेवून आहेत व मार्गदर्शन करीत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com