Indian Tiger Dainik Gomantak
गोवा

Tigers In Goa: गोव्याचे वन खाते म्‍हणते, वाघ दिसलाच नाही! संरक्षणाबाबत प्रामाणिक नसल्याची सरकारवर टीका

Goa Forest Department: राज्यात पट्टेरी वाघ असल्याचे ठोस पुरावे पुन्हा एकदा मिळाले आहेत. परंतु राज्य सरकार एका बाजूने पुन्हा गोव्यातील ते वाघ नसल्याचे सांगत आहे. त्यावर पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर यांनी तीव्र शब्दात राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

New Evidence of Striped Tiger in Goa Mhadei Contradicts Forest Departments Claims

पणजी: राज्यात पट्टेरी वाघ असल्याचे ठोस पुरावे पुन्हा एकदा मिळाले आहेत. परंतु राज्य सरकार एका बाजूने पुन्हा गोव्यातील ते वाघ नसल्याचे सांगत आहे. त्यावर पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर यांनी तीव्र शब्दात राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच राज्य सरकार वाघ संरक्षणाबाबत प्रामाणिक नसल्याचेही त्यांनी निक्षून सांगितले.

केरकर यांनी ‘गोमन्तक टीव्ही‘ला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले की, राज्य सरकारने काय म्हटले आहे, ते आपण ऐकले नाही. परंतु याविषयी गोवा सरकारचा काहीच अभ्यास नाही. मागील दोन वर्षांचा कॅमेरा ट्रॅपचा रेकॉर्ड पाहिल्यास आणि आपण माहिती अधिकार कायद्याखाली माहिती मागितल्यास त्यांनी गोव्यात वाघच नाहीत म्हणून सांगितले. २०२२ मध्ये राष्ट्रीय व्याघ्र गणना झाली, त्यातून पाच वाघ असल्याचे स्पष्ट झाले होते. गोवा राज्य सरकारने वाघ संरक्षणासाठी काहीच प्रयत्न केलेले नाहीत, असेही ते म्हणाले.

राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने वाघ संरक्षणासाठी ज्या सूचना केल्या होत्या त्याची अंमलबजावणी वनखात्याने केलेली नाही. सरकार सतत वाघ नाहीत म्हणून सांगत राहिले, परंतु चार वाघ मारले त्याची सरकारलाही माहिती नव्हती. आपण वनखात्याला फोन करून त्याची माहिती दिली, तेव्हा त्यांना जाग आली,असे केरकर म्हणाले.

‘तो व्‍हिडिओ जुना व गोव्‍यातील नव्‍हेच’

म्हादई वन्यजीव अभयारण्यात वाघिणी आणि तिच्या तीन बछड्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र, हा व्हिडिओ जुना असून तो गोव्याचा नसल्याचे मुख्य वन्यजीव संरक्षक उमाकांत यांनी स्पष्ट केले आहे. उमाकांत यांनी जारी केलेल्या पत्रकात विभागाने अलीकडच्या काळात अशा प्रकारचे कोणतेही निरीक्षण नोंदवले नसल्याचे म्हटले आहे. वन्यजीव क्षेत्राचे निरीक्षण करण्यासाठी विभागाकडे २९ संरक्षण कॅम्प कार्यरत आहेत. या कॅम्पमधूनही वाघांच्या कोणत्याही हालचालींचे पुरावे मिळालेले नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT