Margao Ravindra Bhawan Dainik Gomantak
गोवा

Ravindra Bhawan: मडगाव, मुरगाव, कुडचडे रवींद्र भवन बिनकामाचे!

संगीत, नृत्य, नाट्यकला प्रशिक्षण वर्गाची कमतरता

दैनिक गोमन्तक

Ravindra Bhawan: मडगाव, मुरगाव आणि कुडचडे येथील रवींद्र भवनात संगीत, नृत्य आणि नाट्यकलेचे प्रशिक्षण वर्ग सरकारने अजूनही सुरू केलेले नाहीत, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्‍यातील होतकरू कलाकारांना विविध कला प्रकारांत योग्य प्रशिक्षण देण्यात ‘आयएसओ’ प्रमाणित कला-संस्कृती खात्यातर्फे संचालित रवींद्र भवन पूर्णपणे अपयशी ठरली आहेत.

नुकत्याच संपलेल्या विधानसभा अधिवेशनात विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्न क्रमांक १३३ला कला-संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी दिलेल्या उत्तरात ही माहिती उघड झाली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, मंत्र्यांनी अतारांकित प्रश्न क्रमांक १४७ ला २० जुलै २०२२ रोजी दिलेल्या उत्तरात राज्यातील रवींद्र भवनांमध्ये संगीत आणि नृत्याचे वर्ग सुरू करण्यात आल्‍याची माहिती दिली होती.

राज्य विधानसभेला दिलेल्या माहितीवरून असे दिसून येते की, मडगाव, कुडचडे आणि मुरगाव येथील रवींद्र भवनात आजपर्यंत संगीत, नृत्य व नाट्यकलेचे प्रशिक्षण देणारे कोणतेही अभ्यासक्रम उपलब्ध नाहीत.

विशेष म्‍हणजे गोव्याचे सांस्कृतिक केंद्र म्हणून मडगाव शहराची ओळख आहे.

प्रशिक्षणार्थी २२३५, शिक्षक केवळ २५

कला-संस्कृती खात्याकडे १८० संगीत प्रशिक्षक आहेत. पैकी १७८ कंत्राटी पद्धतीवर तर दोघेजण कायमस्वरूपी नोकरीत आहेत. १९२ संगीत साथीदार कंत्राटी पद्धतीवर आहेत, ६ जण कायमस्वरूपी आहेत. खात्यात नाट्यप्रशिक्षण घेणाऱ्या २२३५ विद्यार्थ्यांसाठी केवळ २५ शिक्षक उपलब्ध असल्याची माहिती कला-संस्कृतीमंत्री गावडे यांनी आपल्या उत्तरातून दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT