Sankalp Amonkar | Congress Updates  Dainik Gomantak
गोवा

काँग्रेसला घाबरून अधिवेशन कालावधीत कपात : संकल्प आमोणकर

दैनिक गोमन्तक

पणजी (Panaji) : गोव्यातील भाजप सरकार सर्व आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले असून कॉँग्रेसच्या आमदारांना तोंड देण्याची हिम्मत त्यांच्यात नाही. सरकारला विविध घोटाळे आणि कारनामे उघडकीस येण्याची चिंता आहे. त्यामुळेच सरकारने अपयश लपवण्यासाठी अधिवेशन कार्यकाळात कपात केली आहे.

विधानसभेचे अधिवेशन खंडित करणे हे सरकारच्या अपयशाचे द्योतक आहे, अशी टीका काँग्रेस (Congress) विधिमंडळ गटाचे उपनेते संकल्प आमोणकर (Sankalp Amonkar) आणि कार्याध्यक्ष तथा आमदार युरी आलेमाव यांनी पत्रकाद्वारे केली आहे. (Latest Goa News In Marathi)

राज्यपालांच्या अभिभाषणावरील प्रस्तावादरम्यान सरकारच्या उणिवा आणि अपयश दाखविण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान आम्ही आर्थिक गैरव्यवस्थापन समोर आणू. विविध खात्यांच्या मागण्यांवर बोलताना आमचे आमदार मतदारसंघनिहाय मुद्दे उपस्थित करतील.

तमनार वीज प्रकल्प, रेल्‍वे दुपदरीकरण आणि मोले राष्ट्रीय उद्यानातील राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण हे तीन रेषीय प्रकल्प रद्द करण्यात यावेत. गेल्या दोन वर्षांपासून या प्रकल्पांच्या विरोधात शांततापूर्ण आंदोलन सुरू असून, सरकारने आंदोलकांवर जे खटले दाखल केले आहेत, ते मागे घ्यावेत, अशी मागणी करणारा खासगी ठराव केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा (Elton DiCosta) यांनी दाखल केला आहे. या ठरावाला सर्वपक्षीय आमदारांनी पाठिंबा द्यावा, अशी आमची अपेक्षा आहे.

खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात प्रसार माध्यमांना सामोरे जाण्याची हिंमत नाही. तसेच मुख्यमंत्री डॉ. सावंत आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांमध्ये काँग्रेस आमदारांचा सामना करण्याचे धैर्य नाही. आम्ही 10 दिवसीय अधिवेशनात सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा पर्दाफाश करू.

- संकल्प आमोणकर, विधिमंडळ उपनेते, काँग्रेस. (Deputy Leader of the Legislature of Congress Sankalp Amonkar)

पंचायत निवडणुकांचे कारण सांगून भयभीत झालेल्या भाजप सरकारचे अपयश उघड होण्यापासून सुटकेचा मार्ग पत्करला आहे. आम्ही गोव्याच्या लोकांचा आवाज बनून राहू. सरकारला वेठीस धरण्यासाठी अधिवेशनातील प्रत्येक संधीचा फायदा घेऊन सरकारला घेरण्यात येईल.

- युरी आलेमाव, कार्याध्यक्ष व आमदार, काँग्रेस. (Chairman and MLA of Congress Yuri Alemao)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sunburn Festival 2024: धार्मिक स्थळी 'असले' कार्यक्रम नकोच! 'सनबर्न' साठीच्या सभेनंतर ग्रामस्थ ठरवणार दिशा

Israel-Iran War: इस्रायल-इराण युद्धानं सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार! भारतासह जगभरातील देशांना बसणार फटका

वेलिंगकरप्रकरणी 'लुकआऊट नोटीस' जारी! हिंदुत्ववादी संघटनांचे समर्थन; पोलिसांची पथके मागावर

'पोल्ट्री उद्योगाला' सरकारकडून पूर्ण सहकार्य देणार! युवकांनी उद्योग-व्यवसायात यावे असे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Rashi Bhavishya 6 October 2024: कष्टातून मिळणार समृद्धी,पार्टनरशिपमधून होणार सुखाची प्राप्ती; जाणून घ्या कसा असेल तुमचा दिवस

SCROLL FOR NEXT