Goa official program cancelled Dainik Gomantak
गोवा

तीन दिवसांतील सरकारी कार्यक्रम रद्द! शिरगाव लईराई जत्रेतील चेंगराचेंगरी प्रकरणाची चौकशी सुरू

Lairai Jatra stampede inquiry: या दुर्दैवी अपघातामुळेच आता पुढील तीन दिवसांत होणारे सर्व सरकारी समर्थित उत्सव कार्यक्रम आणि सार्वजनिक उत्सव रद्द किंवा पुढे ढकलण्याचे निर्देश

Akshata Chhatre

डिचोली: श्री देवी लईराई देवस्थात वार्षिक जत्रेच्यावेळी झालेल्या गंभीर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सहा जणांनी एकाच वेळी जीव गमावला असून अनेकांवर उपचार सुरु आहेत. या दुर्दैवी अपघातामुळेच आता पुढील तीन दिवसांत होणारे सर्व सरकारी समर्थित कार्यक्रम आणि सार्वजनिक उत्सव रद्द किंवा पुढे ढकलण्याचे निर्देश दिले आहेत.

शिरगाव येथील चेंगराचेंगरीत एकाच कुटुंबातील काकू आणि केवळ अकरावीत असलेल्या लहानग्याने देखील जीव गमावला आहे. शिरगाव येथील श्री देवी लईराई जत्रेदरम्यान झालेल्या दुःखद चेंगराचेंगरीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवरच सरकारने हा निर्णय जाहीर केला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे अनेकांकडून पोलीस प्रशासनाकडे बोट दाखवत हा प्रसंग त्यांच्या निष्काळजीपणामुळे ओढावल्याचा आरोप केला जातोय. विरोधी पक्षाकडून देखील हा प्रसंग सरकारच्या बेजबाबदारपणामुळे निर्माण झाला असल्याचं म्हणत टीकास्त्र सोडलं गेलंय.

लईरात्री जत्रोत्‍सवातील चेंगराचेंगरी हे पूर्णपणे प्रशासनाचे अपयश आहे. मृतांच्‍या कुटुंबीयांना सरकारने तातडीने मदत द्यावी. अशी मागणी गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते विजय सरदेसाई यांनी केलीये.

चेंगराचेंगरी प्रकरणाची चौकशी सुरू

शनिवारी (दि. ०३) पहाटे शिरगावात चेंगराचेंगरीची घटना घडली त्यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिस फौज फाटा उपस्थित होता. मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार, धोंडगणांमध्ये वादावादी झाली. असेही सांगण्यात येत आहे की एका दुकानाची वायर तुटल्याने शॉकही आला.

काही व्हिडिओनुसार वादावादीला दुजोरा मिळतोय. आम्ही याआधारे चौकशी सुरू केली आहे अशी माहिती गोवा पोलिसांकडून डीजीपी आलोक कुमार यांनी जाहीर केली.

प्रशासन व देवस्‍थान समितीला दोष नको

या घटनेनंतर लईराई देवस्‍थानचे अध्‍यक्ष दीनानाथ गावकर म्‍हणाले, "झालेली घटना अत्‍यंत दुर्दैवी आहे. त्‍याचा आम्‍हाला खेद आहे. काही धोंडगण व भाविकांच्‍या बेजबाबदारपणामुळे हा दुःखद प्रसंग ओढवला. प्रशासन व देवस्‍थान समितीला दोष देणे चुकीचे ठरेल. पुढे कौल - प्रसाद आहे. तेव्‍हा भाविकांनी गर्दी टाळावी. पाचव्‍या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रशासनानेही दक्षता बाळगावी".

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

SCROLL FOR NEXT