Exclusive Video Of Goa Lairai Devi Yatra Stampede
Viral VideoDainik Gomantak

Exclusive: गोव्यातील लईराई देवीच्या यात्रेत झालेल्या चेंगराचेंगरीचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ समोर Watch Video

Goa Lairai Devi Yatra Stampede: आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी आरोग्य यंत्रणेला सर्तक राण्याची सूचना केली असून, १०४ हा क्रमांक इमर्जन्सी नंबर म्हणून जारी करण्यात आला आहे.
Published on

डिचोली: गोव्यातील प्रसिद्ध लईराई देवीच्या यात्रेत झालेल्या चेंगराचेंगरीत सहा भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर, जवळपास ५० जण जखमी झाले आहेत, यातील ८ ते १० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. शनिवारी (०३ एप्रिल) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेबाबत गोव्यासह देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

शिरगाव येथील लईराईच्या यात्रेला दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक हजेरी लावतात. शुक्रवारी या जत्रोत्सवाला सुरुवात झाली. शनिवारी पहाटेच्या सुमारास येथे चेंगराचेंगरी झाली व सहा भाविकांचा मृत्यू झालाय.

पण, ही घटना नेमकी कशी घडली याचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे. चेंगराचेंगरीत अनेकजण खाली पडल्याचे दिसत आहेत. तर, पोलिस लोकांना गर्दीतून बाहेर काढताना दिसत आहेत. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविक एकत्र आल्याचे दिसत आहे.

Exclusive Video Of Goa Lairai Devi Yatra Stampede
Goa Stampede: देवी लईराईच्या यात्रेत चेंगराचेंगरी! पंतप्रधान मोदींचा CM सावंतांना फोन, राहुल गांधींकडून शोक व्यक्त

या दुर्घटनेत ४० ते ५० भाविक गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. यातील ८ ते १० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर डिचोली आरोग्य केंद्र, म्हापसा जिल्हा रुग्णालय आणि गोमेकॉत उपचार सुरु आहेत.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन, रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी आरोग्य यंत्रणेला सर्तक राण्याची सूचना केली असून, १०४ हा क्रमांक इमर्जन्सी नंबर म्हणून जारी करण्यात आला आहे.

लईराईच्या यात्रेला रात्री होमकुंड प्रज्वलित केल्यानंतर सुरुवात होते. दर्शनासाठी हजारो धोंड आणि भाविक रांगेत उभे असतात. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, सखोल तपासाची सूचना केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या घटनेप्रकरणी शोक व्यक्त केला आहे. मोदींनी मुख्यमंत्री सावंत यांना फोन करुन घटनेचा आढावा घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com