Casinos in Goa| Goa casino news | Goa tourism news Dainik Gomantak
गोवा

पर्यटकांसाठी खुशखबर; गोव्यातील कसिनो पूर्ण क्षमतेने उघडणार

सरकारकडून आदेश: सिनेमा थिएटरही गजबजणार

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यातील कसिनो, व्यायामशाळा, सिनेमागृह, मल्टिप्लेक्स तसेच नाट्यगृहांमध्ये 100 टक्के क्षमतेने तसेच इतर व्यवहार शंभर टक्के सुरू करण्यास परवानगी देण्याचा आदेश राज्य सरकारने आज सोमवारी काढला. मात्र, सार्वजनिक ठिकाणी संचार करताना लसीकरणाचे दोन्ही डोस बंधनकारक आहे. (Goa casino news Updates)

काही दिवसांपूर्वीच सरकारने राज्यातील शाळा, व्यवसाय तसेच इतर व्यवहार पूर्णपणे सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा आदेश जारी होण्यापूर्वीच गेल्या आठवड्यापासून शाळा, महाविद्यालये 100 टक्के सुरू झाली आहेत.

स्पा, व्यायामशाळा, जलतरणसाठीही परवानगी दिल्याने व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. विमानतळ, जल बंदर, रेल्वे तसेच राज्याच्या हद्दीवरून प्रवेश करणाऱ्यांना दोन्ही लसीकरणाचे डोस घेणे आवश्‍यक आहे किंवा 72 तासापूर्वी कोविड निगेटिव्ह चाचणी अहवाल असलेल्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. सरकारने काढलेल्या या आदेशामुळे क्षमतेचे निर्बंध काढून टाकण्यात आले आहे. (Goa tourism news Updates)

कोरोना संदर्भातच्या तज्ज्ञ समितीने राज्यातील कोरोना प्रमाण खूपच कमी झाल्याने दैनंदिन व्यवहार 100 टक्के सुरळीत करण्यास हरकत नाही अशी शिफारस कृती दल समितीकडे केली होती. त्यावर सरकारने निर्णय घेण्याचे ठरविले होते मात्र हा निर्णय समितीची बैठक घेऊन की सरकारच स्वतःच घेऊ शकतो यामुळे त्याला उशीर झाला. गेल्या ३ मार्चलाच मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात मत व्यक्त केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Sri Lanka Test: भारत-श्रीलंका टेस्टचा थरार निर्णायक वळणावर! अखेरच्या दिवशी शुभमन गिलसमोर मोठं आव्हान, विजयासाठी काय असेल रणनीती?

Horoscope: ग्रहांची साथ मिळणार अन् आर्थिक स्थिती सुधारणार! मेष-तुळ राशीला लाभाचे संकेत, मिथुनसह 'या' राशींनी मोठे निर्णय टाळावेत

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

SCROLL FOR NEXT