Airtel अन् Axis Bankचं साटंलोटं; लॉन्च केलं को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड

Bharti Airtel आणि Axis Bank यांनी आर्थिक सेवा ऑफर करण्यासाठी टायअपची घोषणा केली आहे.
Credit card
Credit cardDainik Gomantak

Bharti Airtel आणि Axis Bank यांनी आर्थिक सेवा ऑफर करण्यासाठी टायअपची घोषणा केली आहे. दूरसंचार सेवा कंपनी एअरटेलने (Airtel) अ‍ॅक्सिस बँकेसोबत को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड ( Credit card) लॉन्च केले आहे. या भागीदारी अंतर्गत, एअरटेल ग्राहकांना पूर्व-मंजूर कर्ज देण्याव्यतिरिक्त, 'बाय नाऊ पे लेटर' देखील ऑफर केले जाणार आहे. ही भागीदारी अ‍ॅक्सिस बँकेला टियर-2 आणि टियर-3 मार्केटमध्ये आपला ठसा विस्तारण्यास मदत करणार आहे. Axis Bank एअरटेलच्या 34 कोटी ग्राहकांसाठी क्रेडिट तसेच विविध डिजिटल ऑफरपर्यंत पोहोचण्यास मदत करेल. (Bharti Airtel and Axis Bank have announced a tie up to offer financial services)

Credit card
100 किमी बॅटरी बॅकअपसह, 'या' 10 इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये

गोपाल विट्टल, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, भारती एअरटेल म्हणाले की, एअरटेल आपल्या ग्राहकांना जागतिक दर्जाच्या डिजिटल सेवा देण्याच्या त्यांच्या पुढाकाराचा हा एक भाग म्हणून वित्तीय सेवा पोर्टफोलिओ तयार करत आहे.

तुम्हाला हे फायदे मिळतील

एअरटेल अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड एअरटेल ग्राहकांना कॅशबॅक, विशेष सवलत, डिजिटल व्हाउचर आणि मोफत सेवा यासारखे अनेक फायदे ऑफर केले जाणार आहेत. क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना एअरटेल मोबाइल/डीटीएच रिचार्ज, एअरटेल ब्लॅक आणि एअरटेल एक्सस्ट्रीम फायबर पेमेंटवरती 25 टक्के कॅशबॅक, एअरटेल थँक्स अ‍ॅपद्वारे वीज/गॅस/पाणी बिल पेमेंटवरती 10 टक्के कॅशबॅक, बिगबास्केट, स्विगी, सारख्या पसंतीच्या व्यापाऱ्यांवरती 10 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. तसेच ते Zomato वर खर्च केल्यावर तुम्हाला फायदे मिळतील.

Credit card
नोकियाचा 'हा' मोबाइल करणार धमाल; तब्बल 18 दिवस टिकणार चार्जिंग आणि..

इतर सर्व खर्चांवर 1% कॅशबॅक आणि कार्ड अ‍ॅक्टिव्हेशनवर रु. 500 Amazon ई-व्हाउचर जारी केल्याच्या 30 दिवसांच्या आत तुम्हाला उपलब्ध होतील. हे क्रेडिट कार्ड केवळ पात्र Airtel ग्राहकांना Airtel Thanks अ‍ॅपवरती डिजिटल स्वरूपात उपलब्ध होईल. याव्यतिरिक्त, Axis Bank Airtel च्या डिजिटल सेवांचा विस्तार करेल जसे की C-Pass प्लॅटफॉर्म, Airtel IQ चा व्हॉइस, मेसेजिंग, व्हिडिओ, स्ट्रीमिंग, कॉल मास्किंग आणि व्हर्च्युअल कॉन्टॅक्ट सेंटर सोल्यूशन्स डिजिटल क्षमता वाढवण्यासाठी असेल. (Latest financial news in Marathi)

अ‍ॅक्सिस बँक एअरटेलच्या विविध सायबर सुरक्षा सेवांचाही वापर करेल, तसेच कंपन्या क्लाउड आणि डेटा सेंटर सेवांमध्ये सहकार्याच्या शक्यतांचा शोधही घेतील.

Credit card
1 डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया 77.02 च्या नीचांकी पातळीवर

डिजिटल अर्थव्यवस्थेला मदत करण्यासाठी उचलले मोठे पाऊल

दूरसंचार कंपनी 'SEA-ME-WE-6' नावाच्या पाण्याखालील केबल्सच्या कन्सोर्टियममध्ये सामील झाली आहे तर कंपनीने सांगितले की, याद्वारे कंपनीने आपल्या हाय-स्पीड ग्लोबल नेटवर्कची क्षमता वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, ज्यामुळे भारताच्या वेगाने वाढणाऱ्या डिजिटल अर्थव्यवस्थेला मदत होईल. एअरटेल SEA-ME-WE-6 मध्‍ये प्रमुख गुंतवणूकदार म्हणून सहभागी होत आहे आणि केबल सिस्‍टममधील एकूण गुंतवणुकीपैकी 20 टक्के गुंतवणूक करणार आहे, जी 2025 मध्ये थेट जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com