Good Friday 2025 Dainik Gomantak
गोवा

Good Friday 2025: येशूला वधस्तंभावर खिळले, तरीही 'गुड फ्रायडे' का? वाचा नावामागची कहाणी

Good Friday: गुड फ्रायडे हा ख्रिश्चन धर्मीयांचा एक अत्यंत पवित्र आणि श्रद्धेने साजरा केला जाणारा दिवस आहे. दरवर्षी ईस्टर संडेच्या आधीचा शुक्रवार गुड फ्रायडे म्हणून पाळला जातो.

Sameer Amunekar

Good Friday History

गुड फ्रायडे हा ख्रिश्चन धर्मीयांचा एक अत्यंत पवित्र आणि श्रद्धेने साजरा केला जाणारा दिवस आहे. दरवर्षी ईस्टर संडेच्या आधीचा शुक्रवार गुड फ्रायडे म्हणून पाळला जातो. येशू ख्रिस्त यांना या दिवशी वधस्तंभावर खिळण्यात आले होते.

येशू ख्रिस्तांच्या बलिदानाची आठवण करून देणारा गुड फ्रायडे हा दिवस इतिहासातील एक दुःखद क्षण असला, तरीही त्याला "गुड" म्हणजेच "चांगला" असा उल्लेख का केला जातो, हा प्रश्न अनेकांना पडतो.

'बायबल' या पवित्र ग्रंथानुसार, येशू यांना गोलगोथा नावाच्या ठिकाणी क्रॉसवर खिळण्यात आले. त्यांच्या या मृत्यूला ‘क्रूसीफिक्शन’ म्हटलं जातं. हा प्रसंग ख्रिस्ती धर्मातील अत्यंत वेदनादायक पण तितकाच पवित्र मानला जातो.येशूला देवाचा पुत्र मानले जाते. बायबलमध्ये येशू ख्रिस्त हे देवाचे पुत्र म्हणून अनेक ठिकाणी वर्णन केलेलं आहे. येशूला 'मसीहा' आणि 'देवाचा पुत्र' असंही म्हटलं जाते. त्यांनी समाजाला प्रेम, करुणा, क्षमा आणि सत्याचा संदेश दिला.

'गुड" फ्रायडे' का म्हटलं जातं?

'गुड फ्रायडे' म्हणजे येशूंचा मृत्यू झाला तो दिवस. मग दुःखाचा दिवस गुड का म्हणतात? याचे उत्तर येशूंच्या बलिदानात दडलेले आहे.येशू ख्रिस्तांनी मानवजातीच्या पापांसाठी आपला जीव अर्पण केला. त्यांनी केलेला त्याग ही केवळ एक ऐतिहासिक घटना नव्हे, तर तो एक आध्यात्मिक विजय मानला जातो, म्हणूनच हा दिवस ‘गुड’ म्हणजे शुभ, पवित्र मानला जातो.

गुड फ्रायडेची धार्मिक परंपरा आणि श्रद्धा

गुड फ्रायडेच्या दिवशी ख्रिश्चन धर्मीय चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करतात. चर्चमध्ये येशूंच्या शेवटच्या क्षणांचा देखावा सादर केला जातो. काही ठिकाणी येशूचा मृत्यू कसा झाला याची आठवण करून देणारे धार्मिक कार्यक्रम पार पडतात. चित्ररथ, आणि धार्मिक मिरवणुकांच देखील आयोजन केलं जातं. येशूच्या शिकवणीप्रमाणे क्षमा, प्रेम आणि सेवा या मूल्यांचा मनोमन अंगीकार करण्याचा हा दिवस असतो.

येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर का लवटकवलं?

ख्रिश्चन धर्मीय मान्यतेनुसार, प्रभु येशू ख्रिस्त अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी लोकांना जागरुक करत होते. त्याचवेळी ते जगात प्रेम, ज्ञान आणि अहिंसेचा संदेश देत होते. त्याचवेळी ज्यूंच्या कट्टरवादी धर्मगुरुंनी येशूला कडाडून विरोध केला. धर्मांधांनी त्यावेळचा रोमन गव्हर्नर पिलातुस याला येशूची माहिती दिली. रोमनांना नेहमी ज्यू क्रांतीची भीती वाटत होती.

अशा परिस्थितीत कट्टरवाद्यांना शांत करण्यासाठी पिलातुसने येशूला वधस्तंभावर लटकवून ठार मारण्याचा आदेश दिला. प्रभू येशूने शेवटी सांगितले की, 'हे देवा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करत आहेत हे त्यांना माहीत नाही'. दुसरीकडे, असे म्हटले जाते की, ज्या दिवशी प्रभु येशूला लाकडापासून बनवलेल्या वधस्तंभावर लटकवण्यात आले तो दिवस शुक्रवार होता.

गुड फ्रायडे नंतर येतो ईस्टर संडे

गुड फ्रायडेनंतरचा तिसरा दिवस म्हणजे 'ईस्टर संडेट. ख्रिस्ती धर्मानुसार, येशू ख्रिस्त मृत्यूनंतर तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाले. त्यामुळे गुड फ्रायडे हा दुःखाचा आणि त्यागाचा दिवस असला, तरी त्यानंतर येणारा ईस्टर संडे हा आनंदाचा, नवजीवनाचा आणि आशेचा उत्सव मानला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: फलंदाजीतही 'दीप' चमकला! आकाश दीप विराट-सचिनच्या खास क्लबमध्ये सामील; अशी कामगिरी ठरला चौथा भारतीय खेळाडू

शेवटच्या श्वासापर्यंत देशसेवा करणाऱ्या पर्रीकरांबाबतही ते खोटे बोलले होते; अरुण जेटलींनी धमकी दिल्याचा राहुल गांधींचा दावा हास्यास्पद - प्रमोद सावंत

Handwriting Competition: 'गोमंतक'तर्फे 40 दिवसांची राज्यस्तरीय हस्तलेखन स्पर्धा; आकर्षक बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी

America-Russia Tension: 'रशियासोबत अणुयुद्धासाठी अमेरिका तयार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानं खळबळ; जागतिक राजकारण तापलं VIDEO

बँक कर्ज देण्यास मनाई करत असेल तर तक्रार करा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे शेतकऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT