शेवटच्या श्वासापर्यंत देशसेवा करणाऱ्या पर्रीकरांबाबतही ते खोटे बोलले होते; अरुण जेटलींनी धमकी दिल्याचा राहुल गांधींचा दावा हास्यास्पद - प्रमोद सावंत

Goa CM Pramod Sawant: केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात लढत असताना अरुण जेटली यांनी मला धमकी दिल्याचा दावा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे.
Rahul Gandhi Arun Jaitley threat claim | Pramod Sawant on Parrikar legacy
Rahul Gandhi | Goa CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: शेती कायद्याच्या निषेधावरून अरुण जेटली यांनी राहुल गांधींना धमकी दिल्याचा त्यांचा दावा केवळ हास्यास्पद नाही तर तो लज्जास्पद आणि घृणास्पद देखील आहे, अशा शब्दात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राहुल गांधींचा समाचार घेतला. मनोहर पर्रिकरांची भेट घेतल्यानंतर राफेल खरेदीबद्दल देखील राहुल गांधी खोटे बोलले होते. शेवटच्या श्वासापर्यंत देशाची सेवा करणाऱ्या एका प्रतिष्ठित राजकारण्याचे चुकीचे चित्रण केले होते, असे सावंत म्हणाले.

केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात लढत असताना अरुण जेटली यांनी मला धमकी दिल्याचा दावा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. दिल्लीत आयोजित वार्षिक लीगल कॉन्क्लेवमध्ये गांधी बोलत होते.

"सरकारला अशाच पद्धतीने तुम्ही विरोध केलात तर आम्हाला तुमच्या विरोधात कारवाई करावी लागेल," अशी धमकी जेटली यांनी दिल्याचे राहुल गांधी म्हणाले. दरम्यान, त्यावेळी तुम्ही कोणाशी बोलताय हे तुम्हाला माहितीये का? असे प्रतित्युत्तर त्यांना दिल्याचेही गांधींनी यावेळी सांगितले.

Rahul Gandhi Arun Jaitley threat claim | Pramod Sawant on Parrikar legacy
बँक कर्ज देण्यास मनाई करत असेल तर तक्रार करा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे शेतकऱ्यांना आवाहन

यावरुन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राहुल गांधीवर सडकून टीका केली. राहुल गांधींनी खोटे बोलणे पुरे करावे असे म्हणत गांधी काल्पनिक कथांमध्ये भाजपच्या दिग्गज नेत्यांची नावे निर्लज्जपणे ओढत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

"कृषी कायद्याला केलेल्या विरोधावरुन अरुण जेटलींनी त्यांना धमकी दिल्याचा दावा केवळ हास्यास्पद नाही तर लज्जास्पद आणि घृणास्पद आहे," असे सांवत म्हणाले.

Rahul Gandhi Arun Jaitley threat claim | Pramod Sawant on Parrikar legacy
PM Kisan 20th Installment: पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 20 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; असा तपासा बॅलन्स

तसेच, "हा तोच माणूस आहे, ज्याने आजारी असलेल्या मनोहर पर्रिकरांची भेट घेतल्यानंतर राफेल खरेदीबद्दल खोटे वक्तव्य केले होते. शेवटच्या श्वासापर्यंत देशाची सेवा करणाऱ्या एका प्रतिष्ठित राजकारण्याचे चुकीचे चित्रण त्यांनी केले होते. भारताचे भविष्य प्रामाणिकपणा आणि दृढनिश्चयाने घडवले आहे अशा सर्वात आदरणीय भाजप नेत्यांनाही सोडले नाही," असे सावंत म्हणाले.

"राहुल गांधी, तुम्हाला जे काही बकवास बोलायचे आहे ते बोला. पण ज्यांनी या देशाची सेवा करण्यासाठी आपले रक्त, घाम आणि जीवन वेचले त्यांची नावे घेऊ नका. तुमची निराशा तुम्हाला हयात नसलेल्या नेत्यांची निंदा करण्याचा अधिकार देत नाही," असेही सांवत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com