IND vs ENG: फलंदाजीतही 'दीप' चमकला! आकाश दीप विराट-सचिनच्या खास क्लबमध्ये सामील; अशी कामगिरी ठरला चौथा भारतीय खेळाडू

Akash Deep Record: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ओव्हल (Oval) कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाज आकाश दीप (Aakash Deep) याने फलंदाजीतून सर्वांनाच चकित केले.
Akash Deep Record
Akash DeepDainik Gomantak
Published on
Updated on

Akash Deep Record: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ओव्हल (Oval) कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाज आकाश दीप (Aakash Deep) याने फलंदाजीतून सर्वांनाच चकित केले. दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस 'नाईटवॉचमन' म्हणून मैदानात उतरलेल्या आकाशने तिसऱ्या दिवशी भारताला मजबूत स्थितीत आणण्यात मोलाची भूमिका बजावली. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले अर्धशतक (Maiden Half-century) झळकावले आणि 66 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळून तो माघारी परतला. या खेळीमुळे तो सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीच्या एका खास क्लबमध्ये सामील झाला.

सचिन आणि कोहलीच्या क्लबमध्ये समावेश

दरम्यान, आकाश दीपने 66 धावांची खेळी केल्यानंतर तो 2000 नंतर कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकावर किंवा त्याहून खालील क्रमांकावर 50 किंवा त्याहून अधिक धावा करणारा चौथा भारतीय खेळाडू बनला. त्याच्या आधी फक्त सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), विराट कोहली (Virat Kohli) आणि शुभमन गिल (Shubman Gill) यांनीच अशी कामगिरी केली होती.

Akash Deep Record
IND vs ENG: 'त्याला डिवचणं आमच्या प्लानचा भाग होता...'; जो रुटसोबतच्या वादावर प्रसिद्ध कृष्णाने सोडले मौन!

आकाश दीपने यशस्वी जयस्वालसोबत (Yashasvi Jaiswal) चौथ्या विकेटसाठी 107 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली, ज्यामुळे भारताला लंचपर्यंत 3 बाद 189 धावांपर्यंत मजल मारता आली आणि एकूण आघाडी 166 धावांची झाली. हे त्याचे कसोटी कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्या (Highest Test Score) आहे.

Akash Deep Record
IND vs ENG: प्रसिद्ध कृष्णा अन् जो रुटमध्ये जोरदार बाचाबाची! मैदानावर घडला हाय व्होल्टेज ड्रामा; अंपायरला करावी लागली मध्यस्थी VIDEO

अशी कामगिरी ठरला तिसरा भारतीय

आकाश दीपने ओव्हल कसोटीतील अर्धशतकासह आणखी एक खास विक्रम आपल्या नावावर केला. तो आता परदेशात एकाच कसोटी मालिकेत 10 बळी घेण्यासोबतच 50 पेक्षा जास्त धावा करणारा तिसरा भारतीय खेळाडू ठरला. याआधी हा विक्रम इरफान पठाण (Irfan Pathan) याने एकदा आणि रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याने दोनदा केला होता. आकाश दीपला इंग्लंड दौऱ्यावर एजबेस्टन कसोटी आणि ओव्हल कसोटीत खेळण्याची संधी मिळाली. त्याने दोन्ही सामन्यांमध्ये चांगला खेळ केला. त्याची ही अष्टपैलू कामगिरी भारतीय संघासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com