Good Friday: येशू ख्रिस्ताचे 7 प्रेरणादायी विचार

गुड फ्रायडेच्या निमित्ताने येशू ख्रिस्ताचे प्रेरणादायी विचार जाणून घेऊया
Good Friday
Good FridayDainik Gomantak

दरवर्षी 15 एप्रिल हा दिन 'गुड फ्रायडे' (Good Friday) म्हणून साजरा केला जातो. यालाच ब्लॅक फ्रायडे, ग्रेट फ्रायडे आणि होली फ्रायडे असेही म्हणतात. या दिवशी येशू ख्रिस्ताला देशद्रोहाच्या आरोपाखाली वधस्तंभावर चढवण्यात आले. तो दिवस शुक्रवार होता, तेव्हापासून या शुक्रवारला गुड फ्रायडे म्हणतात. या दिवशी, ख्रिश्चन समुदायाचे लोक चर्चमध्ये एकत्र येतात आणि विशेष प्रार्थना करतात. येशू ख्रिस्ताचे बलिदान आणि त्यांच्या आयुष्यातील शेवटच्या क्षणांचे स्मरण करतात. आज गुड फ्रायडेच्या निमित्ताने येशू ख्रिस्ताचे प्रेरणादायी विचार जाणून घेऊन तुम्ही तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकता.

* इतरांनी तुमच्याशी जसं वागावं असं तुम्हाला वाटतं तसं तुम्ही त्यांच्याशी वागलं पाहिजे.

* गरीब लोकांची सेवा करावी. कोणाकडून काहीही फुकट घेऊ नये.

* निरोगी लोकांसाठी डॉक्टरांची गरज नसून त्यांची गरज आजारी लोकांना आहे. त्याचप्रमाणे मी पवित्र लोकांसाठी नाही, तर पापींच्या पश्चात्तापासाठी आलो आहे.

* एखाद्याने स्वतःच्या शत्रूवरही प्रेम केले पाहिजे. जे लोक आपल्याला त्रास देतात त्यांच्यासाठीही आपण देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. असे केल्याने आपण स्वर्गातील देवाची मुले होऊ. देव वाईट आणि चांगले दोन्हीवर समान रीतीने प्रकाश टाकतो.

Good Friday
मशरूम खाल्याने नैराश्य-नकारात्मक विचार होते दूर

* तुम्ही सर्वांनी एकमेकांवर प्रेम केले पाहिजे. जसे मी तुमच्यावर प्रेम केले तसे एकमेकांवर प्रेम करा.

* कोणीही हिंसा, लोभ, चोरी आणि व्यभिचार करू नये. तुम्ही सर्व लोकांवर प्रेम केले पाहिजे.

* लोकांनी फक्त त्यांच्या अन्नासाठी जगू नये. भगवंताच्या उपदेशानुसार जीवन जगले पाहिजे.

* जर तुम्हाला चांगले जीवन जगायचे असेल तर तुमची सर्व संपत्ती गरिबांना दान करा, तुम्हाला स्वर्ग प्राप्ती मिळेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com