Handwriting Competition: 'गोमंतक'तर्फे 40 दिवसांची राज्यस्तरीय हस्तलेखन स्पर्धा; आकर्षक बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी

State level handwriting contest Goa: इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी 'दैनिक गोमंतक'तर्फे राज्यस्तरीय हस्तलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे
handwriting competition Goa
handwriting competition Goa Dainik Goamantak
Published on
Updated on

Gomantak Handwriting Competition: विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षरामध्ये सुधारणा व्हावी, या उद्देशाने 'दैनिक गोमंतक'ने एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी 'दैनिक गोमंतक'तर्फे राज्यस्तरीय हस्तलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला शिक्षण संचालनालयानेही पाठिंबा दिला असून, सर्व शाळांना जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

स्पर्धेचे स्वरूप आणि नियम

ही स्पर्धा १ ऑगस्ट २०२५ पासून पुढील ४० दिवसांसाठी (रविवार आणि सुट्ट्या वगळून) चालणार आहे. या कालावधीत 'गोमंतक' वृत्तपत्रात दररोज एक उतारा प्रसिद्ध केला जाईल. सहभागी विद्यार्थ्यांना एकूण ४० पैकी कोणत्याही ३० उताऱ्यांची निवड करून ते सुंदर आणि सुवाच्य हस्ताक्षरात लिहायचे आहेत. हे उतारे विद्यार्थ्यांनी रेघ असलेल्या कागदावर (ruled paper) लिहून, शाळेने दिलेल्या सूचनेनुसार मुख्याध्यापकांकडे जमा करायचे आहेत.

handwriting competition Goa
U19 Chess Competition: मंदार, श्रिया यांना बुद्धिबळ विजेतेपद! राज्यस्तरीय 19 वर्षांखालील स्पर्धेत अपराजित घोडदौड

शिक्षण विभागाचे आवाहन आणि बक्षिसे

शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी यासंदर्भात एक परिपत्रक जारी केले आहे. सर्व सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या प्रमुखांना हे परिपत्रक पाठवून, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com