America-Russia Tension: 'रशियासोबत अणुयुद्धासाठी अमेरिका तयार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानं खळबळ; जागतिक राजकारण तापलं VIDEO

Donald Trump Shocking Statement: अमेरिका आणि रशिया यांच्यातील तणावपूर्ण संबंधांदरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक अत्यंत धक्कादायक वक्तव्य केले आहे.
Donald Trump Shocking Statement
Donald TrumpDainik Gomantak
Published on
Updated on

Donald Trump Shocking Statement: अमेरिका आणि रशिया यांच्यातील तणावपूर्ण संबंधांदरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी एक अत्यंत धक्कादायक वक्तव्य केले. रशियासोबत अणुयुद्ध (Nuclear War) लढण्यासाठी अमेरिका पूर्णपणे तयार आहे, असे त्यांनी म्हटले. मात्र, त्याचवेळी त्यांनी असेही स्पष्ट केले की, “अशा परिस्थितीत कोणीही विजयी होत नाही.”

अणु-पाणबुड्यांची तैनाती आणि तणाव वाढला

ट्रम्प यांनी हे वक्तव्य करण्यापूर्वी काही तास आधी रशियाच्या (Russia) जवळ अमेरिकेच्या दोन अणु-पाणबुड्या तैनात करण्याचे आदेश दिले होते. रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेदवेदेव (Dmitry Medvedev) यांनी दिलेल्या ‘अत्यंत चिथावणीखोर (Provocative) विधानां’मुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये (Social Media Post) म्हटले.

ट्रम्प म्हणाले, "अशी वक्तव्ये अनेकदा अनपेक्षित परिणामांना जन्म देतात. मला आशा आहे की मेदवेदेव यांच्या वक्तव्यामुळे असे काही होणार नाही."

Donald Trump Shocking Statement
America China Tension: अमेरिका आणि चीन यांच्यात पुन्हा तणाव; चिनी विद्यार्थ्यांना जबरदस्तीने बाहेर काढल्याचा ड्रॅगनचा आरोप

ट्रम्प आणि मेदवेदेव यांच्यात शाब्दिक चकमक

ट्रम्प आणि मेदवेदेव यांच्यातील शाब्दिक चकमक गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. ट्रम्प यांनी मेदवेदेव यांना ‘रशियाचे अयशस्वी माजी राष्ट्राध्यक्ष’ असे म्हटले होते. यावर प्रत्युत्तर देताना मेदवेदेव यांनी ‘रशिया योग्य मार्गावर असून तो मागे हटणार नाही,’ असे म्हटले होते.

या वादाची सुरुवात तेव्हा झाली, जेव्हा मेदवेदेव यांनी ट्रम्प यांना इशारा दिला होता. मेदवेदेव म्हणाले होते की, “ट्रम्प रशियाशी अल्टिमेटमचा खेळ खेळत आहेत. त्यांनी दोन गोष्टी लक्षात ठेवाव्यात, पहिली म्हणजे रशिया हा इस्रायल किंवा इराण नाही आणि दुसरी म्हणजे प्रत्येक नवीन अल्टिमेटम हे युद्धाकडे एक पाऊल आहे. हे युद्ध रशिया आणि युक्रेनमध्ये नाहीतर त्यांच्या स्वतःच्या देशात (अमेरिकेत) होईल.”

Donald Trump Shocking Statement
Iran-America Tension: इराणच्या 'सर्वात शक्तिशाली ठिकाणी' मोठा स्फोट, अमेरिकेसोबतचा वाढू शकतो तणाव

‘आम्ही पूर्णपणे तयार आहोत’

जेव्हा ट्रम्प यांना पाणबुड्यांच्या ठिकाणाबद्दल विचारले, तेव्हा त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. ते म्हणाले, “आम्हाला हे करणे भाग होते. आम्हाला सावध राहावे लागेल. धमकी दिली गेली होती आणि आम्हाला ते योग्य वाटले नाही. त्यामुळे मला खूप सावध राहावे लागेल.”

ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आपल्या विधानावर जोर देत सांगितले, “मी हे माझ्या लोकांच्या सुरक्षेसाठी करत आहे. जेव्हा तुम्ही अणुशक्तीबद्दल बोलता, तेव्हा आम्हाला तयार राहावे लागते आणि आम्ही पूर्णपणे तयार आहोत.”

मेदवेदेव यांनी 2008 ते 2012 या काळात रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून काम केले होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा व्लादिमीर पुतिन यांच्यासाठी पद सोडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com