Gomantak TV Engineering Excellence Awards 2024 Dainik Gomantak
गोवा

Gomantak TV Excellence Award: ‘अभियंता निपुणता पुरस्कार’ वितरणचा भव्य सोहळा; मुख्यमंत्र्यांकडून गौरवोद्गार

Engineering Excellence Award 2024: सरकारी व खासगी क्षेत्रातील अभियंत्यांनी विकासात आपले योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले

गोमन्तक डिजिटल टीम

Gomantak TV Engineering Excellence Award 2024

पणजी: राज्याच्या शाश्वत विकासात आयुष्यातील सर्वोत्तम योगदान देण्याची अभियंत्यांना संधी आहे. ती संधी घेताना त्यांनी निवृत्तीवेळी हा सर्वोत्कृष्ट प्रकल्‍प साकारला, असे अभिमानाने सांगता आले पाहिजे. गेल्या ५० वर्षांत राज्याच्या विकासाचा विचार केला गेला नव्हता, तसा विचार सरकार आता करत आहे. यात सरकारी व खासगी क्षेत्रातील अभियंत्यांनी आपले योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज बांबोळी येथे केले.

‘गोमन्तक टीव्ही’च्या अभियंता निपुणता पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी उद्योगपती अनिल खंवटे, सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक नीलेश खरे आणि ‘गोमन्तक’चे संपादक-संचालक राजू नायक, ‘गोमन्तक’चे युनिट हेड विजू पिल्लई उपस्थित होते. यावेळी खंवटे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अन्य पुरस्कारांचे वितरणही या कार्यक्रमादरम्यान करण्यात आले.

राज्याच्या विकासात अभियंत्यांचा मोठा वाटा आहे. स्व. मनोहर पर्रीकर हे दूरदष्टीचे नेते होते. त्यांनी अटल सेतू बांधावयास घेतला. मी राजकारणात आलो आणि वित्तीय स्वातंत्र्य असणाऱ्या गोवा साधनसुविधा विकास महामंडळाचा उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी पर्रीकर यांनी दिली. तेथे अभियांत्रिकी क्षेत्राचा जवळून परिचय झाला, असे गौरवोदगार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले.

गोवा साधनसुविधा विकास महामंडळाच्या माध्यमातून अनेक महत्त्वाचे प्रकल्प आकाराला आले. अभियंत्याची दूरदृष्टी कशी असते, ते अटल सेतूच्या रूपाने आपण पाहू शकतो. त्यावेळी दोन पूल असताना तिसऱ्या पुलाची गरज काय, अशी विचारणा करणाऱ्यांना आज त्याचे उत्तर मिळत आहे. अटलसेतूच्या पायाभरणीला, पहिल्या खांबाचा पाया घालताना मी उपस्थित होतो. पुढे ‘रोडकरी’ म्हणून ओळखले जाणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्याने अटल सेतू पूर्ण करण्यात आला आणि पर्रीकर यांच्या हयातीत त्याचे उद्‍घाटन करण्यात आले.

राजकारणी धोरणे ठरवतात; पण विकासात त्याची अंमलबजावणी करताना अभियंत्यांचे कौशल्य कामी येते, असे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले की, १०-१२ वर्षांपूर्वीच्या गोव्याची तुलना आजच्या गोव्याशी करता अभियांत्रिकी कौशल्याने गोव्‍याचा विकास कसा झाला आहे, हे दिसून येते. साळगाव व काकोडा येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प हे अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचे उत्कृष्ट आविष्कार असून ते पाहण्यासाठी देशभरातील अनेकजण येत असतात.

अंदमानच्या तुरुंगासारखाच दुर्लक्षित आग्वाद तुरुंग विकसित केला आहे. हे सारे उत्कृष्ट अभियांत्रिकीमुळे शक्य झाले आहे. राज्याच्या विकासात सर्व क्षेत्रांतील अभियंते योगदान देऊ शकतात, त्यांनी आपल्या कारकिर्दीत संस्मरणीय प्रकल्पांची निर्मिती करून निवृत्तीवेळी अभिमानाने होय, हा प्रकल्प राज्यासाठी दिला, असे सांगावे.

राजू नायक यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले. त्यांनीच ज्युरींचा परिचय करून दिला. नीलेश खरे यांनी मुख्यमंत्री आणि प्रभू यांनी गणेशमूर्ती भेट दिली. शैलेश डान्स अकादमीच्या कलाकारांनी सादर केलेल्या गणेश वंदनेने कार्यक्रमास सुरवात झाली. त्याआधी अग्नीहोत्र करण्यात आले. वैभव कामत आणि विराज वेरेकर या अभियंता तरुणांनी गीते गाऊन कार्यक्रमात रंगत आणली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Shravan Recipes in Goa: कणगाची खीर, नागपंचमीला पातोळ्या; श्रावणातील गोव्याची समृद्धता

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

SCROLL FOR NEXT