‘लोकल ते ग्‍लोबल’ प्रतिभावंत अभियंत्‍यांचा आज गौरव; ‘गोमन्‍तक टीव्‍ही’तर्फे कृतार्थ अभिवादन

Engineering Excellence Award 2024: गोव्‍यापासून आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवलेले; सरकारी तसेच खासगी क्षेत्रातील अभियंत्‍यांना पुरस्‍कार देऊन गौरविण्‍याचा प्रयोग गोव्‍यात प्रथमच होत आहे
Engineering Excellence Award 2024: गोव्‍यापासून आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवलेले; सरकारी तसेच खासगी क्षेत्रातील अभियंत्‍यांना पुरस्‍कार देऊन गौरविण्‍याचा प्रयोग गोव्‍यात प्रथमच होत आहे
Gomantak TV Engineering Excellence Award 2024| M VisvesvarayaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: समाज व राष्ट्र जीवनातील ‘अभियंता’ हा महत्त्वाचा दुवा. एखाद्या ओहोळावरील साकव बांधण्‍यापासून ग्रहांवरती पाठवण्‍यात येणाऱ्या यानापर्यंत अभियंता नाही, अशी जागाच नाही. अभियंत्यांचे शास्त्र जैवअभियांत्रिकी, यंत्रमानव निर्मितीपर्यंत पोहोचले आहे. ‘लोकल ते ग्‍लोबल’ उत्‍थानार्थ अविरत योगदान देणाऱ्या अभियंत्‍यांचा आज ‘गोमन्‍तक टीव्‍ही इंजिनिअर्स एक्‍सलन्‍स ॲवॉर्ड २०२४’द्वारे गौरव करण्‍यात येत आहे.

गोव्‍यापासून आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवलेले; सरकारी तसेच खासगी क्षेत्रातील अभियंत्‍यांना पुरस्‍कार देऊन गौरविण्‍याचा प्रयोग गोव्‍यात प्रथमच होत आहे. कुजिरा-बांबोळी येथील मुष्‍टिफंड संस्‍थेच्‍या इंडिशिला सभागृहात निमंत्रित सातशे अभियंते, बुद्धिजीवी नागरिकांच्‍या भरगच्‍च उपस्‍थितीत होणाऱ्या सोहळ्याला नृत्‍य कलेच्‍या आविष्‍काराने ‘चार चाँद’ लागणार असून, यावेळी महनीय व्‍यक्‍तिमत्त्‍वांच्‍या हस्‍ते पुरस्‍कारांचे थाटात वितरण होणार आहे.

नामवंत ज्‍युरींनी केली निवड

हरिष मेलवानी-उद्योजक, नीना पाणंदीकर- डॉन बॉस्‍को कॉलेजच्‍या प्राचार्य, दत्ता खोलकर-उद्योजक, ओलाव कार्वाल्‍हो-अभियंता, संदीप नाडकर्णी-निवृत्त अभियंता, उत्तम पार्सेकर-मुख्‍य अभियंता बांधकाम विभाग, मयूर हेदे- अधीक्षक अभियंता वीज खाते, महेंद्र खांडेपारकर-उद्योजक, अन्‍वर खान-अध्‍यक्ष इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स गोवा, विवेक सरदेसाई-वीज अभियंता, दिलीप कामत-कन्‍सल्‍टंट इंजिनिअर आदी ज्‍युरींनी पुरस्‍कारांसाठी प्रतिभावंत अभियंत्‍यांची निवड केली आहे.

पुरस्‍कारप्राप्‍त मान्‍यवर

अनिल खंवटे (जीवन गौरव), अशांक देसाई, डॉ. मंगेश कोरगावकर (जागतिक स्‍तरावरील उत्‍कृष्‍ट अभियंता श्रेणी), शेखर सरदेसाई (बेस्‍ट गोवन इंजिनिअरिंग ब्रँड), शिखा पांडे (मनोहर पर्रीकर ऑलराऊंडर पुरस्‍कार), व्‍यंकटेश धेंपो (नॉन इंजिनिअरिंग माईंड ॲवॉर्ड), प्रज्‍योत माईणकर (गोवन इंजिनिअरिंग स्‍टार्टअप ॲवॉर्ड), डॉ. अमृता नाईक (महिला अभियंता, खासगी क्षेत्र), ऑदेत डिसिल्‍वा (महिला अभियंता, सरकारी सेवा), आनंद मावजो (सरकारी अभियंता पुरस्‍कार), आत्‍माराम गावडे (मेगा स्‍ट्रक्‍चर ॲवॉर्ड), वल्‍लभ सामंत (बेस्‍ट परफॉर्मिंग), शोहरत शेख (बेस्‍ट परफॉर्मिंग), आग्‍नेलो त्रिनिदाद (बेस्‍ट परफॉर्मिंग), सुनया शिरोडकर (ॲवॉर्ड फॉर बेस्‍ट आयटी इंजिनिअर), प्रसाद सावंत (डिझाईन ऑफ द इयर), उत्तम पार्सेकर (विशेष पुरस्‍कार), उत्‍कृष्‍ट प्रकल्‍प (अनुक्रमे तीन क्रमांक - फर्मागुडी कॉलेज, फातोर्डा कॉलेज, फातोर्डा कॉलेज).

सर विश्वेश्वरैय्या यांचे स्‍मरण

अभियंता हा शब्द या ‘इंजिनिअम’ या लॅटीन शब्दापासून बनला आहे. याचा अर्थ वस्तूला किंवा सेवेला अंतर्गत गुणवत्ता प्राप्त करून देणारा तंत्रज्ञ असा होतो. सर्वांत जुनी व प्रभावी ज्ञानशाखा म्हणून नागरी अभियांत्रिकीला ओळखले जाते. या क्षेत्रात दमदार पाऊल कुणी टाकले असेल तर ते सर विश्वश्वरैय्या (M Visvesvaraya) यांनी! त्‍यांच्‍या जयंतीदिनी अभियंत्‍यांना पुरस्‍काररूपी कौतुकाची थाप देण्‍यासाठी ‘गोमन्‍तक टीव्‍ही’ने ‍ पुढाकार घेतला आहे.

Engineering Excellence Award 2024: गोव्‍यापासून आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवलेले; सरकारी तसेच खासगी क्षेत्रातील अभियंत्‍यांना पुरस्‍कार देऊन गौरविण्‍याचा प्रयोग गोव्‍यात प्रथमच होत आहे
Gomantak TV Engineers Excellence Award 2024: स्टार महिला क्रिकेटर शिखा पांडे आणि शेखर सरदेसाईंचा होणार सन्मान

या पुरस्‍कार वितरण सोहळ्याला मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (प्रमुख पाहुणे), माजी केंद्रीय ऊर्जा, रेल्‍वेमंत्री सुरेश प्रभू (विशेष अतिथी) यांची उपस्‍थिती असेल. शिवाय मंत्रिमंडळातील ज्‍येष्‍ठ सदस्‍य, विरोधी पक्षांतील आमदार, खासदार कार्यक्रमस्‍थळी दाखल होतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com