Bodgeshwar Temple Dainik Gomantak
गोवा

Bodgeshwar Temple: मंत्री विश्वजित राणे यांच्याकडून श्री बोडगेश्‍वरचरणी सोन्याची मशाल अर्पण

माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मशाल अर्पण

गोमन्तक डिजिटल टीम

Bodgeshwar Temple: म्हापसा येथील श्री देव बोडगेश्वरला मंत्री विश्वजित राणे यांच्याकडून माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सोन्याची मशाल आज अर्पण करण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आमदार डॉ. देविया राणे उपस्थित होत्या.

मंत्री राणे यांनी यंदा जत्रोत्सवावेळी देवदर्शन घेतल्यानंतर आपल्या वडिलांच्या वाढदिनी देवाला सोन्याची मशाल अर्पण करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार त्यांचे वडील माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांचा आज 28 रोजी वाढदिवस असल्याने ही मशाल देवाला अर्पण करण्यात आली.

यानिमित्त मंदिरात लघुरूद्र व मशालीचे शुद्धीकरण करण्यात आले. यानंतर सदर मशाल देवस्थानाकडे सुपूर्द करण्यात आली.

याबाबतची माहिती आमदार डॉ. देविया राणे यांनी ट्विट करत दिली. त्या म्हणाल्या,"श्री प्रतापसिंह राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही म्हापसा येथील मंदिरात देव बोडगेश्वरला सोन्याची मशाल अर्पण केली. या शुभ दिवशी मशाल दान करण्याचा अत्यंत आनंदाचा आणि सन्मानाचा क्षण आहे. यावेळी आम्ही गोव्यातील लोकांच्या कल्याणासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT