Goa News: पुस्तकांच्या दुनियेत रमणारे चालतेबोलते ग्रंथालय

जयकुमार लवंदे यांनी कादंबऱ्या, कथासंग्रह, ऐतिहासिक, प्रवासवर्णन आदी मिळून आतापर्यंत जवळपास तीन हजार पुस्तकांचे वाचन करुन ती संग्रहितही करुन ठेवली आहेत.
Goa News |Books
Goa News |BooksDainik Gomantak
Published on
Updated on

Goa News: जयकुमार लवंदे हे केवळ पुस्तकांशी रमणारे व्यक्तिमत्त्व नव्हे, तर त्यांनी आतापर्यंत वाचलेली आणि संग्रहित केलेल्या पुस्तकांचा आकडा पाहता लवंदे म्हणजे चालतेबोलते ग्रंथालय किंवा पुस्तकांचा खजिना म्हटले तर वावगे ठरणार नाही.

जयकुमार लवंदे यांनी कादंबऱ्या, कथासंग्रह, ऐतिहासिक, प्रवासवर्णन आदी मिळून आतापर्यंत जवळपास तीन हजार पुस्तकांचे वाचन करुन ती संग्रहितही करुन ठेवली आहेत.

नोकरीनिमित्त मालाड-मुंबई येथे स्थायिक झालेले जयकुमार लवंदे हे मूळ साखळी शहरातील. हाउजिंग बोर्ड-साखळी येथे त्यांचे बंगलावजा घर आहे. अधूनमधून त्यांचे तेथे येणे-जाणे असते. लहानपणापासून जडलेला पुस्तके वाचणे व संग्रहित करण्याचा छंद नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर लवंदे यांनी आजही जोपासला आहे.

Goa News |Books
Goa Agriculture: म्हावळींगेत पठाराला आग; काजूची झाडे भस्मसात

पुस्तक विकत घेतल्यानंतर ते विकत घेतल्याची तारीख नमूद करणे आणि त्यावर स्वाक्षरी करणे. पुस्तक वाचल्यानंतर ते व्यवस्थित ठेवणे. ही जयकुमार लवंदे यांची खासियत.

वाचनामुळे ज्ञानात भर पडते, बुद्धी प्रगल्भ होते. 'पुस्तके वाचाल तर जगाल' असा संदेश कार्यक्रम किंवा एखाद्या व्याख्यानातून आपणाला मिळत असतो. आजच्या माहितीआणि तंत्रज्ञान युगात वाचन संस्कृती मागे पडत असल्याची भीतीही व्यक्त होत आहे.

तरीदेखील 81 वर्षे वयाचे जयकुमार लवंदे यांचे अजूनही पुस्तकांशी असलेले नाते आणि त्यांचे वाचन प्रेम आजच्या युवा पिढीसाठी निश्चितच आदर्शवत आणि प्रेरणादायी असेच आहे.

Goa News |Books
Illegal Construction: अवैध बांधकामावर पुन्हा हातोडा

नूतन वाचनालयाला पुस्तके

जयकुमार लवंदे यांनी संग्रहित केलेली जवळपास 8 लाख रुपये किमतीची मिळून एक हजार 791पुस्तके डिचोलीतील ''नूतन वाचनालया’ला भेट दिली आहेत. यापुढेही या वाचनालयास पुस्तके देण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून त्यांनी वाचनालय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे ही पुस्तके दिली.

कादंबऱ्या, कथासंग्रह, प्रवासवर्णन आदी विविध प्रकारच्या पुस्तकांचा या पुस्तकांमध्ये समावेश आहे. घरी संग्रह करून ठेवण्यापेक्षा वाचनालयाला पुस्तके भेट दिली, तर पुस्तके सत्कर्मी लागतील.

वाचकांनी आपण दिलेली पुस्तके वाचावीत, असे आवाहन त्यांनी केले. मुंबईतील मराठा ग्रंथ संग्रहालय आणि सोसायटीला पुस्तके भेट दिली आहेत, असेही जयकुमार लवंदे यांनी सांगितले.

युवापिढीला संदेश...

मोबाईल, संगणक युगामुळे आजची युवा पिढी वाचन संस्कृतीपासून लांब आहे. मोबाईल, संगणक आदी तंत्रज्ञान ही आजच्या शिक्षणाची गरज असली तरी निरंतर वाचनातून मिळणारे ज्ञान हा ठेवा असतो. परीक्षेत गुण मिळविण्यापुरते वाचन न करता आजच्या मुलांनी वेळ काढून निरंतर वाचन करावे, असा संदेश जयकुमार लवंदे यांनी दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com