Gogol Gulistan Mosque Murder Dainik Gomantak
गोवा

Gogol Masjid Crime: घोगळ खून प्रकरणातील 6 संशयित अजूनही फरार, आदेश येईपर्यंत मशीद बंदच Video

Gogol Gulistan Mosque Murder: खून प्रकरणात फातोर्डा पोलिसांनी सात जणांना अटक केली असली तरी या खूनात सहभागी असण्‍याची शक्‍यता असलेले सहा संशयित अजूनही फरार आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: घोगळ हाऊसिंग बोर्ड येथील सुन्नी गुलिस्‍तान मशिदीजवळ झालेल्‍या खून प्रकरणात फातोर्डा पोलिसांनी सात जणांना अटक केली असली तरी या खूनात सहभागी असण्‍याची शक्‍यता असलेले सहा संशयित अजूनही फरार आहेत.

पोलिसानी या सहा जणांना शोधून काढण्‍यासाठी सर्व हाऊसिंग बोर्ड परिसर पिंजून काढला. या सर्व संशयितांचे मोबाईल फोन बंद असल्‍याने या शोध मोहिमेत व्‍यत्‍यय येत आहे. या भागात आणखी तणाव वाढू नये, यासाठी दोन दिवसांसाठी सील ठोकलेल्‍या मशिद बंद ठेवण्‍याची मुदत आणखी वाढवली असून पुढील आदेश येईपर्यंत हे सील कायम राहील, असा आदेश दक्षिण गोव्‍याचे उपजिल्‍हाधिकारी गणेश बर्वे यांनी जाहीर केला.

सध्‍या मडगाव कोठडीत असलेला मुख्‍य संशयित अक्रम खान याच्‍याशी तपास अधिकाऱ्याची परवानगी न घेता संवाद साधल्‍याबद्दल कादर शहा याचीही चौकशी पोलिसांनी सुरु केली आहे. या प्रकरणात शहा याच्‍या विरोधात कारस्‍थान रचण्‍यात हातभार लावल्‍याचा गुन्‍हा नाेंद होऊ शकतो, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

यासंदर्भात, फातोर्डा पोलीस स्‍थानकाचा ताबा असलेले पोलीस निरीक्षक धितेंद्र नाईक यांच्‍याशी संपर्क साधला असता, शहा याने संशयिताशी संपर्क साधला की नाही याबद्दल मडगाव पोलिसांकडून आम्‍ही स्‍पष्‍टीकरण मागितले आहे. मडगाव पोलीस निरीक्षकाकडून अहवाल आल्‍यानंतर पुढील कारवाई केली जाईल असे त्‍यांनी सांगितले.

दरम्यान, घोगळ मशिदीचे उपाध्‍यक्ष अली कलंदर खानजादे याच्‍या खून प्रकरणी दहा जणांवर गुन्‍हा नोंद केला होता. नंतर त्‍यात आणखी तीन नावाची जोड देण्‍यात आली. सध्या फरार असलेल्‍या सहा संशयितांच्‍या घराची पोलिसांनी झडती घेतली मात्र ते घरी सापडू शकले नाहीत. त्‍यांचे मोबाईल फोनही बंद स्‍थितीत पाेलिसांना आढळले. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांकडून काही हलगर्जीपणा झाला आहे का याचीही खात्‍याअंतर्गत चौकशी सुरु झाली आहे.

सीसीटीव्हीत प्रकार कैद

सूत्राकडून मिळालेल्‍या माहितीनुसार, कादर शहा हा अक्रम खान याच्‍याकडे मडगाव पोलीस कोठडीत स्‍थानबद्ध असताना बोलत असल्‍याचे ‘सीसीटीव्‍ही’ त कैद झाले आहे. त्‍यामुळे या प्रकरणात कादर शहाही गाेत्‍यात आला आहे. पोलीस निरीक्षक नाईक यांच्‍याशी संपर्क साधला असता, या खून प्रकरणात आतापर्यंत सात जणांना अटक केली आहे आणि बाकीच्‍या संशयितांचा आम्‍ही शोध घेत आहोत अशी माहिती त्‍यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मानवजातीच्या विनाशाची नवी वेळ निश्चित! 100 कोटी वर्षांनंतर सजीव सृष्टीचा होणार 'द एंड'; नासाच्या सुपरकॉम्प्युटरचा थरारक अंदाज

एलपीजी सिलेंडर की पीएनजी? स्मार्ट किचनसाठी निवडा योग्य पर्याय; स्टोरेजच्या कटकटीपासून ते बुकिंगच्या वेटिंगपर्यंत सिलेंडरची 5 आव्हाने

Global Terrorist Amir Hamza Attack: लाहोरमध्ये रक्ताचा सडा! हाफिज सईदचा विश्वासू आमीर हमजावर खूनी हल्ला; अज्ञात हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Goa IPL Betting Racket Busted: 6 जणांना बेड्या, 50 एटीएम कार्ड अन् 10 लाखांचा मुद्देमाल जप्त; गोव्यात सट्टेबाजीचं रॅकेट उद्ध्वस्त; सांगोल्ड्यात मध्यरात्री पोलिसांचा छापा

Lenskart Policy Controversy: टिकली-टिळा लावण्याचं पूर्ण स्वातंत्र्य; लेन्सकार्ट वादावर पियुष बन्सल यांनी मागितली माफी

SCROLL FOR NEXT