Goa IPL Betting Racket Busted: 6 जणांना बेड्या, 50 एटीएम कार्ड अन् 10 लाखांचा मुद्देमाल जप्त; गोव्यात सट्टेबाजीचं रॅकेट उद्ध्वस्त; सांगोल्ड्यात मध्यरात्री पोलिसांचा छापा

Cyber Crime Police Raid Sangolda: गोवा पोलिसांनी अशाच एका मोठ्या रॅकेटचा छडा लावत सांगोल्डा परिसरात छापेमारी करुन ऑनलाइन सट्टेबाजी चालवणाऱ्या सहा जणांना रंगेहाथ पकडले.
Cyber Crime Police Raid Sangolda
Goa IPL Betting Racket BustedDainik Gomantak
Published on
Updated on

Goa IPL Betting Racket Busted: आयपीएल 2026 चा हंगाम सध्या शिगेला पोहोचला असतानाच या क्रिकेट महाकुंभाच्या आडून बेकायदेशीर सट्टेबाजी करणाऱ्या टोळ्याही सक्रिय झाल्या आहेत. गोवा पोलिसांनी अशाच एका मोठ्या रॅकेटचा छडा लावत सांगोल्डा परिसरात छापेमारी करुन ऑनलाइन सट्टेबाजी चालवणाऱ्या सहा जणांना रंगेहाथ पकडले. सायबर क्राईम विभागाने अत्यंत गुप्तरीत्या ही कारवाई केली असून अटकेत असलेले सर्व आरोपी परराज्यातील असल्याचे उघड झाले.

पोलिसांना सांगोल्डा येथील एका घरातून आयपीएल सामन्यांवर ऑनलाइन जुगार खेळला जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पथक तयार करुन संबंधित ठिकाणी धाड टाकली. यावेळी सहा तरुण लॅपटॉप आणि मोबाईलच्या साहाय्याने विविध वेबसाईटवर सट्टेबाजी करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी घटनास्थळावरुन 6 लॅपटॉप, 31,000 रुपयांची रोकड, तब्बल 50 एटीएम कार्डे, अनेक मोबाईल फोन आणि 'म्युल अकाउंट किट्स' जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या या सर्व साहित्याची एकूण किंमत अंदाजे 10 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Cyber Crime Police Raid Sangolda
IPL Betting: आयपीएल सट्टेबाजीचा पर्दाफाश; सांकवाळ येथील एका भाड्याच्या घरात छापा, चौघांना अटक

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये गुजरात, राजस्थान, सुरत आणि पश्चिम बंगालमधील तरुणांचा समावेश आहे. गेदिया राज दिलीपभाई (गुजरात), भीमराज मीणा (राजस्थान), निलेश रतीभाई हिरानी (सुरत), शनी दीपकभाई चावडा (गुजरात), रोकड यश जयसुखभाई (गुजरात) आणि प्रशांत त्रिवेदी (पश्चिम बंगाल) अशी या आरोपींची नावे आहेत. हे सर्व आरोपी आंतरराज्य सट्टेबाजीचे रॅकेट चालवत होते. त्यांच्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणात एटीएम कार्डे आणि बँक किट्स सापडल्यामुळे हा केवळ जुगाराचाच नव्हे तर मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार आणि सायबर फसवणुकीचा प्रकार असावा, असा संशय पोलिसांना आहे.

Cyber Crime Police Raid Sangolda
Illegal IPL Betting: गोवा पोलिसांकडून आरोपी 'हिट विकेट'! कळंगुटमध्ये 1 लाखांहून अधिक बेटिंगचा मुद्देमाल जप्त

ऑनलाइन सट्टेबाजीसाठी या आरोपींनी विविध बँक खात्यांचा वापर केला असून या खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पैशांची देवाणघेवाण झाल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले. गोवा सायबर क्राईम पोलीस आता या प्रकरणाची अधिक सखोल चौकशी करत असून या रॅकेटचे धागेदोरे आणखी कोणत्या राज्यांपर्यंत पोहोचले आहेत, याचा शोध घेतला जात आहे. आयपीएलच्या (IPL) काळात तरुण पिढी अशा बेकायदेशीर सट्टेबाजीच्या आहारी जाऊ नये, यासाठी पोलिसांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले असून अशा गुन्हेगारी कारवायांविरुद्ध कडक मोहीम सुरुच राहणार असल्याचे स्पष्ट केले. या कारवाईमुळे गोव्यातील (Goa) अवैध जुगार अड्ड्यांवर आणि सट्टेबाजी करणाऱ्यांवर पोलिसांचा मोठा वचक निर्माण झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com