Lenskart Uniform Policy Controversy: लेन्सकार्टच्या युनिफॉर्म पॉलिसीवरुन गदारोळ, पियुष बन्सल यांनी फेटाळल्या अफवा; म्हणाले, "आम्ही भारतीयांच्या श्रद्धेचा मान राखतो"

Peyush Bansal Response to Social Media Influencer: प्रसिद्ध आयवेअर ब्रँड 'लेन्सकार्ट' सध्या सोशल मीडियावर त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या ड्रेस कोड आणि धार्मिक चिन्हांबाबतच्या एका कथित धोरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला.
Peyush Bansal Response to Social Media Influencer
Peyush Bansal Dainik Gomantak
Published on
Updated on

Lenskart Employee Uniform Policy Controversy: प्रसिद्ध आयवेअर ब्रँड 'लेन्सकार्ट' सध्या सोशल मीडियावर त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या ड्रेस कोड आणि धार्मिक चिन्हांबाबतच्या एका कथित धोरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला. एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने 'एक्स'वर कंपनीच्या अंतर्गत पॉलिसीचा हवाला देत गंभीर आरोप केले. या आरोपांनुसार, लेन्सकार्टच्या नियमावलीत हिजाब परिधान करण्यास परवानगी आहे, परंतु टिकली, टिळा किंवा हातातील कलावा (धार्मिक धागा) बांधण्यास मज्जाव करण्यात आल्याचा दावा करण्यात आला. हा दावा सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरल्यानंतर नेटकऱ्यांनी कंपनीवर कडक भाषेत टीका करण्यास सुरुवात केली.

दरम्यान, आता या वादावर खुद्द लेन्सकार्टचे संस्थापक पियुष बन्सल यांनी स्वतः पुढाकार घेत अधिकृत स्पष्टीकरण दिले. बन्सल यांनी सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होणारा तो मेसेज "चुकीचा आणि दिशाभूल करणारा" असल्याचे म्हटले. त्यांनी स्पष्ट केले की, ऑनलाइन शेअर केली जाणारी माहिती कंपनीच्या सध्याच्या मार्गदर्शक तत्त्वांचे प्रतिबिंब नाही. लेन्सकार्टच्या धोरणांमध्ये धार्मिक अभिव्यक्तीवर कोणतीही बंधने लादलेली नाहीत, असे त्यांनी ठामपणे सांगितले. बन्सल म्हणाले की, "आमच्या धोरणात टिकली, टिळा किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या धार्मिक चिन्हांवर कोणतीही बंदी नाही. आमची ग्रूमिंग पॉलिसी गेल्या काही वर्षांत विकसित झाली असून जुन्या गोष्टी आम्ही आज कोण आहोत याचे प्रतिनिधित्व करत नाहीत."

Peyush Bansal Response to Social Media Influencer
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या कारखाली पोलिस कॉन्स्टेबल चिरडला? भाजपने शेअर केला व्हिडिओ Watch

बन्सल यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे असेही नमूद केले की, या परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या गोंधळाबद्दल आणि चिंतेबद्दल ते माफी मागतात. लेन्सकार्ट हा भारतामध्ये भारतीयांनी आणि भारतीयांसाठी तयार केलेला ब्रँड आहे. भारतभरातील आमचे हजारो टीम मेंबर्स दररोज आपल्या स्टोअरमध्ये आपली श्रद्धा आणि संस्कृती अभिमानाने जपतात आणि तेच खऱ्या अर्थाने 'लेन्सकार्ट' आहेत. भाषेतील किंवा धोरणांमधील कोणतीही चूक भविष्यातही सुधारली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

Peyush Bansal Response to Social Media Influencer
Rahul Gandhi: 'मृत' मतदारांसोबत राहुल गांधींची 'चाय पे चर्चा'! निवडणूक आयोगावर पुन्हा साधला निशाणा; VIDEO

हा संपूर्ण वाद एका अंतर्गत दस्तऐवजाच्या आधारे सुरु झाला, ज्यामध्ये धार्मिक भेदाभेद केल्याचा आरोप करण्यात आला. मात्र, संस्थापकांनी या दाव्यांचे पूर्णपणे खंडन केले असून आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या परंपरांचे पालन करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले. बन्सल यांच्या या सडेतोड स्पष्टीकरणानंतर आता या वादावर पडदा पडण्याची शक्यता निर्माण झाली. कंपनीने आपल्या संस्कृती आणि परंपरेचा सन्मान कधीही धोक्यात येऊ दिला जाणार नाही, असेही शेवटी आवर्जून सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com