मानवजातीच्या विनाशाची नवी वेळ निश्चित! 100 कोटी वर्षांनंतर सजीव सृष्टीचा होणार 'द एंड'; नासाच्या सुपरकॉम्प्युटरचा थरारक अंदाज

NASA Supercomputer Earth End Prediction: अमेरिकेची अंतराळ संस्था 'नासा'च्या एका महासंगणकाने पृथ्वीवरील सजीव सृष्टीचा अंत कधी होणार, याबाबतचा धक्कादायक आकडा मांडला असून या संशोधनामुळे वैज्ञानिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली.
NASA Supercomputer Earth End Prediction
NASA Supercomputer Earth End PredictionDainik Gomantak
Published on
Updated on

NASA Supercomputer Earth End Prediction: नास्त्रेदमस आणि बाबा वेंगा यांच्या भविष्यावाणींनी आजवर जगाला अनेकदा हादरवून सोडले, परंतु आता या दोघांच्या अंदाजांपेक्षाही भयानक आणि वैज्ञानिक आधार असलेली एक भविष्यवाणी समोर आली. अमेरिकेची अंतराळ संस्था 'नासा'च्या एका महासंगणकाने पृथ्वीवरील सजीव सृष्टीचा अंत कधी होणार, याबाबतचा धक्कादायक आकडा मांडला असून या संशोधनामुळे वैज्ञानिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली.

नासाच्या (Nasa) या सुपरकॉम्प्युटरने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आजपासून साधारणतः 100 कोटी वर्षांनंतर पृथ्वीवरील जीवनाचा पूर्णपणे अंत होईल. 'नेचर जिओसायन्स' या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, शास्त्रज्ञ काजुमी ओझाकी आणि ख्रिस्तोफर टी. रेनहार्ड यांनी पृथ्वीच्या हवामानाचा आणि सूर्याच्या वाढत्या उष्णतेचा सखोल अभ्यास केला. यापूर्वीच्या संशोधनात पृथ्वीच्या अंतासाठी 200 कोटी वर्षांचा कालावधी वर्तवण्यात आला होता, परंतु नव्या संशोधनाने हा वेळ निम्म्यावर आणला. म्हणजेच, मानवजात आणि इतर सजीवांकडे पूर्वी वाटत होते त्यापेक्षा कमी वेळ शिल्लक आहे.

NASA Supercomputer Earth End Prediction
Donald Trump: "मी राष्ट्राध्यक्ष व्हावं असं त्याला वाटत नव्हतं..." अल्पवयीन मुलींची तस्करी करणाऱ्या एपस्टीनसोबतच्या मैत्रीवर ट्रम्प बोलले

या विनाशाचे मुख्य कारण 'ऑक्सिजनचा तुटवडा' हे असणार आहे. शास्त्रज्ञांच्या मते, 100 कोटी वर्षांनंतर पृथ्वीच्या वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण 1 टक्क्यापेक्षाही कमी होईल. पृथ्वीवरील कार्बोनेट-सिलिकेट चक्र आणि सूर्याची वाढती प्रखरता यामुळे ऑक्सिजन निर्मितीची प्रक्रिया थांबेल. आज आपण ज्या वातावरणात श्वास घेतो, त्यात 20 टक्के ऑक्सिजन आहे, जो झाडे आणि सूक्ष्मजीव तयार करतात. परंतु, सूर्याची उष्णता जसजशी वाढत जाईल, तसतशी ही झाडे आणि सूक्ष्मजीव नष्ट होतील. जेव्हा झाडेच उरणार नाहीत, तेव्हा ऑक्सिजन तयार होणे बंद होईल आणि पृथ्वीवर कार्बन-डाय-ऑक्साइडचे प्रमाण वाढून प्रचंड उष्णता निर्माण होईल.

NASA Supercomputer Earth End Prediction
Baba Venga: भूकंपापासून ते पुतिनच्या हत्येपर्यंत... बाबा वेंगांची भविष्यवाणी खरी होणार का?

नासाच्या 'ॲस्ट्रोबायोलॉजी इन्स्टिट्यूट'च्या माहितीनुसार, सूर्य दररोज अधिक तप्त आणि प्रखर होत चालला आहे. या वाढत्या उष्णतेमुळे पृथ्वीचा पृष्ठभाग पूर्णपणे कोरडा पडेल. समुद्राचे पाणी वाफेच्या रुपात हवेत विरघळेल आणि जमिनीला भेगा पडतील. ही स्थिती साधारणतः 10,00,00,2021 सालाच्या आसपास उद्भवू शकते, असा अंदाज आहे. जेव्हा ऑक्सिजन संपेल, तेव्हा माणूस आणि प्राणी श्वास घेऊ शकणार नाहीत आणि अवघ्या काही काळातच संपूर्ण पृथ्वी एक ओसाड वाळवंट बनेल. तिथे केवळ बॅक्टेरियासारखे काही सूक्ष्मजीवच तग धरु शकतील.

NASA Supercomputer Earth End Prediction
Baba Venga: बाबा वेंगा यांची भविष्यवाणी ठरली खरी, काही तासांत...

हे संशोधन सांगते की 25 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर जी स्थिती होती, तिचीच पुनरावृत्ती 100 कोटी वर्षांनंतर होणार आहे. 25 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर ऑक्सिजन अत्यंत कमी होता, त्यानंतर 'ग्रेट ऑक्सिडेशन इव्हेंट'मुळे नवीन सजीव निर्माण झाले आणि त्यांनी ऑक्सिजन तयार केला. आज आपण त्याच हवेत श्वास घेत आहोत. मात्र, भविष्यात ही प्रक्रिया उलट फिरणार आहे.

NASA Supercomputer Earth End Prediction
Sarvona Shigmotsav: ‘गावात पेटली होळी, विवाहितांवर आली देवळात झोपण्याची पाळी'! सर्वण गावातील अनोखी परंपरा..

मानवासमोर हे एक भयानक वास्तव असले तरी, शास्त्रज्ञांनी आशेचा किरणही दाखवला आहे. 100 कोटी वर्षांचा काळ खूप मोठा आहे. या काळात मानव प्रगत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने दुसऱ्या ग्रहावर वस्ती शोधू शकतो किंवा कृत्रिमरीत्या ऑक्सिजन तयार करण्याचे मार्ग शोधू शकतो. परंतु, नैसर्गिक ऑक्सिजनचा (Oxygen) आधार संपणार हे मात्र नासाच्या या सुपरकॉम्प्युटरने स्पष्ट केले. ही भविष्यवाणी म्हणजे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी मानवाला मिळालेला एक दूरदृष्टीचा इशाराच म्हणावा लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com