Govind Gaude meets Central Minister Anurag Thakur  Dainik Gomantak
गोवा

Govind Gaude: कांपाल येथे उभारणार खेलो इंडिया निवासी संकुल; क्रीडामंत्री गावडे यांची माहिती

केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग यांच्याकडून अनुकूल प्रतिसाद

किशोर पेटकर

Govind Gaude: केंद्र सरकारच्या खेलो इंडिया राज्य क्रीडा उत्कृष्टता योजनेअंतर्गत गोव्यात टेबल टेनिस, बॅडमिंटन आणि जलतरण या तीन खेळांचे निवासी प्रशिक्षण केंद्र सुरू आहे.

या शिबिरातील प्रशिक्षणार्थींची निवासाची सोय करणाऱ्या संकुलाचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राला सादर केला असून त्यास केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी अनुकूल प्रतिसाद दिल्याची माहिती राज्याचे क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी दिली.

(Goa's sports minister Govind Gaude Meets Central Minister Anurag Thakur)

क्रीडामंत्री गावडे यांनी गुरुवारी दिल्लीत केंद्रीयमंत्री अनुराग यांची भेट घेतली. त्याविषयी गावडे यांनी सांगितले, की ‘‘गोव्यात होणाऱ्या 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन आणि संबंधित तयारी याबाबत राज्य सरकारच्या कामाची माहिती केंद्रीय क्रीडामंत्र्यांना सविस्तर देण्यात आली.

त्यांनी प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले. गोव्यात खेलो इंडियांतर्गत सुरू असलेल्या प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींच्या निवासासाठी कांपाल-पणजी येथे निवासी संकुल उभारण्याचे नियोजन आहे. त्यासंदर्भात प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्रालयास सादर करण्यात आला आणि त्यास केंद्रीयमंत्र्यांनी अनुकूलता दर्शविली.

सध्या या केंद्रातील प्रशिक्षणार्थींची निवासाची सोय मिरामार येथील यात्री निवासात आहे आणि त्यासाठी सरकारतर्फे भाडे भरले जाते.’’

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Airstrikes Yemen Houthis: शेवटच्या मिनिटाला ऑर्डर बदलली! ट्रम्प यांनी अचानक का रोखला हूती बंडखोरांवरील लष्करी हल्ला? मध्य पूर्वेत महायुद्धाची ठिणगी पडता पडता वाचली

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

SCROLL FOR NEXT