Pramod Sawant: अखेर रखडलेले अनुदान मिळणार; क्रीडा संघटनांना मुख्यमंत्र्यांकडून दिलासा

राष्ट्रीय स्पर्धा तयारीसाठी आठवडाभरात निधी
Pramod Sawant with sports representatives
Pramod Sawant with sports representatives Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

sports representatives in Goa meets Goa CM Pramod Sawant: राज्यातील विविध क्रीडा संघटनांच्या रखडलेल्या आर्थिक बाबींसदर्भात संबंधितांनी गुरुवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे लक्ष वेधले. निधीअभावी गोव्यात होणाऱ्या 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी खेळाडू आणि संघाची तयारी शिबिर घेण्याबाबत आर्थिक विवंचनेत असलेल्या क्रीडा संघटनांच्या शिष्टमंडळास अखेर दिलासा मिळाला.

रखडलेली अनुदान रक्कम त्वरित वितरीत करण्याचे आणि शिबिरासाठी पन्नास टक्के निधी आठवडाभरात संबंधित संघटनांच्या खात्यात थेट हस्तांतरीत करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

Pramod Sawant with sports representatives
Wimbledon: नोव्हाक जोकोविचचा मोठा रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला तिसरा खेळाडू

केंद्रीय मंत्री, गोवा ऑलिंपिक संघटनेचे (जीओए) अध्यक्ष श्रीपाद नाईक यांच्या नेतृत्वाखाली विविध राज्य क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची पणजीतील पर्यटन भवनात भेट घेतली आणि भेडसावणाऱ्या महत्त्वपूर्ण समस्येची माहिती दिली.

रखडलेले अनुदान वितरीत व्हावे आणि 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी संघ तयारीसाठी निधी मिळावा ही या शिष्टमंडळाची मुख्य मागणी होती.

या शिष्टमंडळात गोवा ऑलिंपिक असोसिएशनचे उपाध्यक्ष जयेश नाईक, तायक्वांदो असोसिएशन ऑफ गोवाचे अध्यक्ष नवीन पै रायकर, जिम्नॅस्टिक संघटनेचे अध्यक्ष सुदेश ठाकूर, ट्रायथलॉन संघटनेच्या निशा मडगावकर, गोवा बॉक्सिंग संघटनेचे सचिव मुख्तार अमलानी यांचा समावेश होता.

पूर्ण सहकार्याचे आश्वासन

गोव्यात होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी संघ आणि खेळाडूंच्या तयारीसाठी क्रीडा उपकरणांची खरेदी आवश्यक असून त्यासाठी तातडीने निधी आवश्यक असल्याचे शिष्टमंडळाने मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या निदर्शनास आणून दिले.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी क्रीडा संघटनांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार, क्रीडा संघटनांचे रखडलेले अनुदान त्वरित वितरीत केले जाईल आणि राष्ट्रीय स्पर्धा तयारी व शिबिरासाठी आवश्यक असलेल्या निधीतील पन्नास टक्के रक्कम संबंधित राज्य क्रीडा संघटनेच्या खात्यावर पुढील आठवड्यापर्यंत थेट जमा केले जाईल.

बाकी निधी प्रारंभिक वितरित रकमेचा हिशेब सादर केल्यानंतर दिला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले.

Pramod Sawant with sports representatives
Ashes 2023: तब्बल 6037 दिवसांनी ऍशेसमध्ये 'असं' घडलंय! दोन दिग्गजांविना उतरले इंग्लंड-ऑस्ट्रेलिया

राज्यासाठी पदके जिंकण्याची अपेक्षा

क्रीडा संघटना शिष्टमंडळाने अनुदान व निधीप्रकरणी आश्वस्त केल्याबद्दल आणि सहकार्याबद्दल मुख्यमंत्री सावंत यांचे आभार मानले, तसेच केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांनाही धन्यवाद दिले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत खेळाडूंकडून गोव्यासाठी पदके जिंकण्याचे महत्त्व आणि अपेक्षा प्रतिपादली.

खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण पुरविण्याची आणि पदकांची ग्वाही संबंधित क्रीडा संघटनांच्या प्रतिनिधींनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa wedding destination registration
Goa Chief Minister Statement
CM pramod sawant kannada remark controversy
goa cm pramod sawant peons warning