Training Center Delhi Photos Dainik Gomantak
गोवा

DGP म्हणतात ट्रेनिंग सेंटर स्वच्छ; मग दिल्लीत गोव्याचे प्रशिक्षणार्थी पोलिस कसे आजारी पडले?

प्रशिक्षणार्थींनी अकादमीतील अस्वच्छतेचा व्हिडिओ शेअर केला होता

Rajat Sawant

दिल्लीतील पोलिस अकादमीत प्रशिक्षणासाठी पाठवलेल्या गोव्यातील अनेक कॉन्स्टेबलना अन्न विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिस महानिरीक्षक ओमवीर सिंग बिश्नोई दिल्लीला रवाना झाले. त्यांनी दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

दिल्लीतील पोलिस अकादमीतील अस्वच्छतेचे छायाचित्र उमेदवारांनी शेअर केले होते. दरम्यान गोव्याचे पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनी अकादमीचे फोटो शेअर करीत ती पोलिस अकादमी स्वच्छ असल्याचा एकप्रकारे दावाच केल्याचे दिसून येत आहे. मग हे प्रशिक्षणार्थी पोलिस आजारी का पडले असा सवाल उपस्थित होत आहे.

Training Center Delhi Photos

पोलिस खात्यात भरती झालेल्या 900 कॉन्स्टेबलपैकी 500 कॉन्स्टेबलना प्रशिक्षणासाठी दिल्लीतील पोलिस अकादमीत पाठवले. परंतु तेथे अनेकांना अन्न विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. अकादमीचे स्वयंपाकघर अस्वच्छ असल्याच्या तक्रारीही आल्या.

गोवा पोलिस खात्याने या तक्रारींची गंभीर दखल घेतली. परिस्थितीचा आढावा घेऊन समस्येचे निवारण करण्यासाठी पोलिस महानिरीक्षक ओमवीर सिंग बिश्नोई दिल्लीला रवाना होत प्रशिक्षण घेणाऱ्या गोवा पोलिसांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले तसेच दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

Training Center Delhi Photos

शुक्रवारी संध्याकाळी समोर आलेल्या व्हिडिओमध्ये अस्वच्छ शौचालये, उरलेले अन्न आणि अस्वच्छ मोकळी जागा दाखवली आहे. याला विरोध दर्शविला असता तेथील प्रशिक्षकांनी मारहाण केल्याचा गोवा पोलिसांचा दावा आहे.

दरम्यान गोव्याचे पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनी अकादमीचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अकादमी स्वच्छ असल्याचे दिसून येत आहे.

पोलिस नेमके आजारी कसे पडले?

दिल्लीतील पोलिस अकादमीतील परिसर स्वच्छ असल्याचा दावा पोलिस महासंचालक करीत आहेत. तर दुसरीकडे परिसर अस्वच्छ असल्याचे फोटोदेखील समोर आले आहेत. मग नेमके कॉन्स्टेबल आजारी पडण्याचे कारण काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यात पोट भरणाऱ्या महाराष्ट्रातील तरुणावर प्राणघातक हल्ला; झारखंडच्या संशयिताला पणजीत अटक

Goa Today News Live: विद्यापीठ निवडणूक रद्द; एनएसयुआयचा विरोध

GOA vs UP: गोव्याचा युवा महिला संघ पुन्हा पराभूत, हर्षिताचे अर्धशतक व्यर्थ; उत्तर प्रदेश पाच विकेटने विजयी

Bicholim: डिचोली तालुक्यात भाजी, मिरची लागवडीची लगबग; दीडशेहून अधिक हेक्टर क्षेत्रात उत्पादन शक्य

Mapusa: म्हापशातील कोमुनिदाद प्रशासक इमारत कमकुवत, शासनाकडून दखल नाही; कर्मचाऱ्यांच्या जिवाला धोका

SCROLL FOR NEXT