USA: माणूस म्हणावं की सैतान? हत्या केलेल्याचे ह्रदय काढून बटाट्यांसोबत फ्राय करून खाल्लं

या व्यक्तीवर चार वर्षांच्या मुलासह आणखी दोन जणांची हत्या केल्याचा आरोप आहे
USA Crime News
USA Crime News
Published on: 
Updated on: 

USA Crime News: अमेरिकेच्या ओक्लाहोमा राज्यात एका महिलेच्या वेदनादायक हत्येचे प्रकरण 2021 मध्ये समोर आले. चांगल्या वागणुकीमुळे तुरुंगातून सुटलेल्या व्यक्तीने ही हत्या केली होती. पण, या घटनेनंतर पुन्हा त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

लॉरेन्स पॉल अँडरसन असे या 44 वर्षीय आरोपीचे नाव आहे. अँडरसनने 2021 मध्ये एका महिलेची हत्या केली आणि तिचे हृदय बाहेर काढल्यानंतर ते शिजवून खाल्ले.

या व्यक्तीवर चार वर्षांच्या मुलासह आणखी दोन जणांची हत्या केल्याचा आरोप आहे. तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

लॉरेन्स पॉल अँडरसनची सुटका झाल्यानंतर काही आठवड्यांनंतर अँड्रिया ब्लँकेनशिप नावाच्या महिलेची हत्या करण्यात आली. हत्येनंतर त्याने महिलेचे हृदय बाहेर काढले आणि मावशीच्या घरी नेले. त्यानंतर त्याने हृदय आणि बटाटे एकत्र शिजवले.

USA Crime News
Amritpal Singh : खलिस्तानी समर्थक अमृतपालच्या अटकेसाठी सर्च ऑपरेशन, पंजाबमध्ये हाय अलर्ट

विविध ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार, त्यानंतर त्याने 67 वर्षीय लिओन पै आणि त्याची 4 वर्षांची नात केओस येट्स यांची चाकूने वार करून हत्या केली. अँडरसनला यापूर्वी अंमली पदार्थांच्या प्रकरणात 20 वर्षांची शिक्षा झाली होती, परंतु चांगली वागणूक असलेल्या कैद्यांच्या यादीत समाविष्ट झाल्यानंतर तीन वर्षांतच त्याची सुटका करण्यात आली.

अँडरसनला खून, प्राणघातक हल्ला आणि खंडणी घेतल्याप्रकरणी दोषी ठरवल्यानंतर त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. या हल्ल्यात जखमी झालेल्या अँडरसनची मावशी आणि इतर पीडितांच्या कुटुंबीयांनी ओक्लाहोमाचे गव्हर्नर आणि तुरुंगाच्या पॅरोल बोर्डाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Indian Expat Murdered In Sharjah UAE
Couple Caned For Adultery In Indonesia
Guwahati Crime News
Minneapolis Shooting 2 Dead Suspect Dead
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com