Goa CM Dr Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: परप्रांतीयांचा मुद्दा तापणार; मुख्यमंत्री सावंतांनी थेटच सांगितलं, 'प्रत्येक क्षेत्रात घुसखोरी'

Manish Jadhav

राज्यात परप्रांतीयांचा मुद्दा पुन्हा एकदा तापणार असे संकेत मिळत आहेत. या मुद्यावर आता खुद्द राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भाष्य केले आहे. राज्यातील प्रत्येक धंद्यात परप्रांतीय घुसखोरी करत असल्याचे मुख्यमंत्री सावंत म्हणाले. उत्तर गोव्यातील एका कार्यक्रमात बोलत असताना मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केले.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, ''राज्यातील प्रत्येक धंद्यांमध्ये आता परप्रांतीय घूसू लागले आहेत. गोव्याच्या भवितव्यासाठी हे खूपच घातक आहे. असेच चालू राहिल्यास भविष्यात गोमंतकीय कुठलाच धंदा करु शकणार नाही.''

गोमंतकीयांचे रोजगार धोक्यात!

कामगार व रोजगार विभागाकडे परप्रांतीय कामगारांच्या संख्येची पंचायतनिहाय नोंद नाही. या विभागाकडे गोव्यातील परप्रांतीय कामगारांच्या विरुद्ध एकही तक्रार किंवा खटलेही नाहीत, असे कामगार आणि रोजगार मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी यापूर्वी सांगितले होते. गोवा हे पर्यटनस्थळ असल्याने अलीकडे राज्यात स्थलांतरितांच्या ओघाबद्दल समस्या भेडसावत आहे. राज्यात गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. परप्रांतीय लोकांकडे रोजगार जात आहे आणि अलीकडच्या काळात स्थलांतरित मोठ्या संख्येने गोव्यात स्थायिक होत आहेत.

अत्याचाराच्या घटना!

गोव्यातील वाढत्या अत्याचाराच्या परप्रांतीयांचा सहभाग चिंताजनक आहे. काही दिवसांपूर्वी, अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी वाळपई पोलिसांनी गोव्यात काम करणाऱ्या आणि मूळचा जोधपूर राजस्थान येथील रहिवासी असलेल्या रामनिवास बिस्नोई (25) याला अटक केली होती. आरोपीने अल्पवयीन मुलीशी मैत्री करुन तिच्यावर बलात्कार केला होता. पीडितेने घडलेला प्रकार कुटुंबांना सांगितल्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी वाळपई पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Automated vacuum Sewer: आधुनिक पद्धतीने सांडपाणी व्यवस्थापन करणारे गोवा ठरले पहिले राज्य!

Sunburn Festival Goa: अमलीपदार्थ, देहव्यापाराला चालना देणारे उत्सव आमच्या इथे नकोच; दक्षिण गोव्यातले नेत्यांचा निर्धार

Baga Crime: गोव्यात पर्यटकांचा धुडगूस! स्थानिकांना मारहाण; संतप्त जमावाचा पोलिसांना घेराव

गोव्यात येऊन 'काहीही' करून चालणार नाही! पर्यटकांनी निसर्ग पाहावा, संस्कृती समजून घ्यावी; संपादकीय

Goa History: पुरातन काळातील मुंडारींचा वारसा सांगणारी 'गावडा संस्कृती'

SCROLL FOR NEXT