गोव्यात आज (31 ऑगस्ट) दिवसभरात 64 नवे कोरोनाबाधित आढळून आले असून, 159 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज एकाही कोरोना रूग्णाचा मृत्यू झालेला नाही. गोव्याचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट मात्र मागील दोन दोन आठवड्यांपासून 10 टक्क्याहूंन अधिक असून, 12.07 टक्के एवढा आहे.
आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गोव्यातील एकूण कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 2 लाख 56 हजार 182 एवढी झाली आहे. त्यापैकी 2 लाख 51 हजार 468 जण यशस्वी उपचारानंतर बरे झाले आहेत. राज्याचा कोरोना रिकव्हरी रेट 98.16 टक्के एवढा झाला आहे. आज दिवसभरात 581 प्रयोगशाळा नमुने तापसले आहेत.
गोव्यात 751 सक्रिय कोरोना रूग्ण
गोव्यात सध्याच्या घडीला 751 सक्रिय कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आज नव्याने एक रूग्ण रूग्णालयात दाखल करण्यात आला आहे. मागील आठवड्यात सहा कोरोना रूग्ण दगावले असून, गोव्यात आजवर 3963 कोरोना रूग्ण मृत्यूमुखी पडले आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.