Sonali Phogat प्रकरणाचा तपास CBI कडे द्या; मुलगी यशोधरा फोगाटची मागणी

उत्तर प्रदेश मधून एक संशयित ताब्यात, चौकशी सुरू
Sonali Phogat प्रकरणाचा तपास CBI कडे द्या; मुलगी यशोधरा फोगाटची मागणी

भाजप नेत्या आणि टिक टॉक स्टार म्हणून प्रसिद्ध असेलल्या सोनाली फोगाट (Sonali Phogat) यांचे 23 ऑगस्ट रोजी गोव्यात निधन झाले. याप्रकरणी गोवा पोलिसांनी संशयितांना अटक केली आहे. पण, फोगाट यांची मुलगी यशोधरा फोगाट हिने या प्रकणाच्या तपासाबाबत असमाधानी असल्याचे म्हटले आहे. सोनाली फोगाट प्रकरणाचा तपास सीबीआय कडे देण्यात यावा अशी मागणी यशोधरा फोगाटने (Yashodhara Phogat) केली आहे.

यशोधरा फोगाट म्हणाली, 'माझ्या आईला न्याय देण्याचा हा विषय आहे, आणि आम्ही मागे हटणार नाही. सध्या सुरू असलेल्या तपासाबाबत आम्ही असमाधानी आहोत. या प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण (CBI) यांच्याकडे सोपविण्यात यावा,' अशी मागणी तिने केली आहे.

Sonali Phogat प्रकरणाचा तपास CBI कडे द्या; मुलगी यशोधरा फोगाटची मागणी
सोनाली फोगाट यांना जबरदस्तीने पेय पाजतानाचा व्हिडिओ व्हायरल

दरम्यान, सोनाली फोगाट प्रकरणाच्या अधिक तपास करण्याप्रकरणी गोवा पोलिस (Goa Police) आज सोनाली फोगाट यांच्या हिस्सार, हरियाणा या मुळगावी पोहचले आहेत. गोवा पोलिस सोनाली फोगाट यांचे फार्म हाऊस, फोगाट यांचे निवासस्थान त्यानंतर गुरूग्राम येथे देखील पोलिस या प्रकरणाचा तपास करणार आहेत. हरियाणा पोलिसांनी (Haryana Police) गोवा पोलिसांना संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे म्हटले आहे.

उत्तर प्रदेश मधून एक संशयित ताब्यात, चौकशी सुरू

दरम्यान, गोवा आणि हरियाणा पोलिसांनी सोनाली फोगाट प्रकरणात उत्तर प्रदेश येथून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. शिवम असे या व्यक्तीचे नाव आहे, तो आपला मोबाईल बंद करून गाजियाबाद येथे लपून बसला होता. पोलिसांनी त्याच्याकडून लॅपटॉप, फोन असे साहित्य जप्त केले आहे. त्याच्याकडून अधिक तपास करत असल्याचे हरिणायाना पोलिसांनी सांगितले आहे.

यापूर्वी गोवा पोलिसांनी सोनाली फोगाट प्रकरणात फोगट यांचा स्वीय सहायक सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग पाल यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. दोघेही सध्या पोलिस कोठडीत आहेत. तसेच, कर्लिस बार आणि ड्रगपेडलर यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. फोगाट प्रकरणाच्या तपास प्रकरणी गोवा पोलिस हरियाणात पोहचले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात आणखी काही धागेदोरे समोर येतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com