Sandesh and Laxman Naik from Canacona, KGF 2 Movie News, Sandesh and Laxman Naik News Dainik Gomantak
गोवा

काणकोणमधील गायक भावंडांचा दक्षिणात्य सिनेमामध्ये डंका

केजीएफ चाप्टर -2 सिनेमात काणकोणच्या संदेश आणि लक्ष्मण नाईक यांचा आवाज

Subhash Mahale

काणकोण : गोमंतकीय कलाकारांनी आपल्या नावाची मोहर आजतागायत सर्वत्र उमटवली आहे. बॉलिवूड, क्रीडा, संशोधन अशा सर्वच क्षेत्रात गोमंतकीयांनी आपलं नाव कोरलं आहे. आता के.जी.एफ. चाप्टर -2 या दक्षिणात्य हिंदी सिनेमाच्या तुफान गीत गायनात काणकोणच्या दोन गायक बंधूनी सहभाग घेतला आहे. (Sandesh and Laxman Naik News)

के.जी.एफ. चाप्टर -2 या दक्षिणात्य हिंदी सिनेमाच्या तुफान या गीत गायनात काणकोणच्या लक्ष्मण नाईक व संदेश नाईक या दोन गायक बंधूचा सहभाग आहे. या गीत गायनात ब्रिजेश शाहिल्या, मोहन कृष्ण, साज भट्ट, संतोष वैेकी, सचिन बसरूर, रवी बसरूर, प्रियांका भाल्ली व अन्य गायक कलाकारांचा (Artist) सहभाग आहे. या सिनेमातील गीतांना रवी बसरूर यांनी संगीत दिले आहे.

हा सिनेमा (Movie) हिंदी, कन्नड, मल्याळम, तामिळ आणि तेलगु अशा पाच भाषांत 22 एप्रिलला प्रदर्शित करण्यात येणार आहे. शंभर कोटी रुपये बजेटचा हा सिनेमा प्रशांत नील यांनी दिग्दर्शित केला आहे. संदेश आणि लक्ष्मण यांनी राज्यासह देशाच्या वेगवेगळ्या भागात आपले शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायनाच्या मैफली पेश केल्या आहेत. बॉलीवूड (Bollywood) सिनेमात गीत सादर करण्याची ही पहिलीच संधी सिनेमाच्या निर्मात्यांनी दिल्याचे नाईक बंधूंचं म्हणणं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT