Adv Aires Rodrigues
Adv Aires Rodrigues  Dainik Gomantak
गोवा

Aires Rodrigues: गोव्यातील RTI कार्यकर्ते ॲड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी सोडले देशाचे नागरिकत्व

Akshay Nirmale

Aires Rodrigues Portuguese Citizenship: गोव्यातील सुमारे 23 हजार नागरिकांनी देशाचे नागरिकत्व सोडल्याची माहिती समोर आल्यानंतर आता त्यामध्ये राज्यातील कोण कोण व्यक्ती आहेत, ती माहितीही समोर येत आहे.

यामध्ये सध्या समोर आलेले महत्वाचे नाव म्हणजे माहिती अधिकार कार्यकर्ते ॲड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी गोव्याचे नागरिकत्व सोडले आहे. त्यांनी आता पोर्तुगीजचे नागरिकत्व स्विकारले आहे.

याबाबत रॉड्रिग्ज यांनी म्हटले आहे की, गेली काही वर्षे राज्य सरकार मी भारतीय नसून पोर्तुगीज असल्याचे सांगत आहे. माझा जन्म 24 मे 1960 चा आहे. म्हणजे गोवामुक्ती पुर्वीचा. म्हणजे मी तांत्रिकदृष्ट्या पोर्तुगीज जन्माला आलो आहे.

गोव्यातील अनेक नागरिकांची लिस्बन येथे पोर्तुगीज नागरिक म्हणून नोंद आहे. त्यामुळे सखोल विचारांती मी पोर्तुगीज पोसपोर्टसाठी अर्ज केला. आणि भारतीय पासपोर्ट जमा केला आहे.

पोर्तुगीज नागरीकत्व स्विकारल्यानंतरही माझे सर्व अधिकार तसेच राहणार आहेत केवळ मी भारतात निवडणूक लढवू शकणार नाही, मतदानही करू शकणार नाही. गोव्यात शेती करू शकणार नाही, शेतजमिन खरेदी करू शणार नाही.

तथापि, ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया या नात्याने माझ्या व्यवसायावर काहीही परिणाम होणार नाही.

पोर्तुगीज व्हिसासाठी गोवेकरांना लाखो रूपये मोजताना पाहिले आहे. मला हा व्हिसा मोफत मिळाल्याने मी 188 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करू शकणार आहे. असे असले तरी मी नेहमीच गोमंतकीय राहीन. भारत देशही माझ्या हृदयाजवळ आहे.

गोवा आणि रायबंदरबाबत मी कृतज्ञ आहे. येथेच माझा जन्म झाला आहे, पालनपोषण झाले आहे, जे कधीच विसरता येणार नाही, असेही रॉड्रिग्ज यांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Assagao Demolition: रमजानच्या दिवशी दोनापावल येथे शिजला घर पाडण्याचा कट, पूजा शर्माची अटक टाळण्यासाठी धडपड

Colva Police: सतावणूक केली, शंभर डॉलरही घेतले; कोलवाच्या 'त्या' PSI विरोधात आणखी एका महिलेची तक्रार

Goa Accident: अपघात नव्हे घातपात! कन्‍हैया कुमारच्या शरीरावर आढळल्या वाराचे निशाण, फोंडा पोलिस संशयाच्‍या घेऱ्यात

Goa DGP जसपाल सिंग तातडीने दिल्लीत का गेले होते? बदलीबाबत हालचालींना वेग

कोणत्याही क्षणी येणार आदेश, Goa DGP जसपाल सिंग तातडीने दिल्लीला रवाना

SCROLL FOR NEXT