CM Pramod Sawant on UCC: गोव्यात समान नागरी कायदा चालतो, तर मग देशात का नको? मुख्यमंत्र्यांचा सवाल

गोव्यात या कायद्यामुळे काहीही अडचण आली नाही; यूसीसीवरून राजकारण नको
CM Pramod Sawant on UCC
CM Pramod Sawant on UCCDainik Gomantak
Published on
Updated on

CM Pramod Sawant on UCC: नवभारत आणि नवनिर्माणासाठी देशात समान नागरी कायदा (यूसीसी) लागू केला गेला पाहिजे, असे मत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.

गोव्यात राज्याच्या स्वातंत्र्यापासूनच समान नागरी कायदा लागू आहे. तर देशात सध्या हा कायदा देशभर लागू करण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. त्या पार्श्वभुमीवर टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीने याबाबत डॉ. सावंत यांचे मत जाणून घेतले.

CM Pramod Sawant on UCC
सतर्क रहा! गोव्यात दोन दिवस ऑरेन्ज अलर्ट; पडझड, वाहतूक कोंडीसह राज्यात कुठे काय झाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यप्रदेशमध्ये बोलताना समान नागरी कायद्यावरून मुस्लिमांची दिशाभूल केली जात आहे, असे वक्तव्य केले होते. तसेच या कायद्याला राजकारणाशी जोडू नका, त्यावर राजकारण करू नका, असेही मोदी म्हणाले.

त्या पार्श्वभुमीवर 'यूसीसी' किती शक्य आहे, त्याची अंमलबजावणी कशी शक्य आहे? याविषयी मुख्यमंत्री सावंत यांच्याकडून टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीने माहिती जाणून घेतली.

CM Pramod Sawant on UCC
Vasco Traffic Police : वास्को वाहतूक पोलिसांची कारवाई; दमदार कामगिरी सहा महिन्यात केलाय... एवढ्या लाखाचा दंड वसूल

डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, गोव्यात समान नागरी कायदा (यूसीसी) आधीपासून लागू आहे. माननीय पंतप्रधान जे बोलले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. समान नागरी कायदा लागू करणारे गोवा हे पहिले राज्य आहे. संपूर्ण देशात हा कायदा लागू झाला पाहिजे.

जात, धर्माच्या आधारे कशाबाबतही विभाजन, वर्गवारी होता कामा नये. विवाह नोंदणी, मालमत्तेचा अधिकार, जन्मनोंदणी या सर्वांसाठी हा एकच कायदा आहे. जर हाच कायदा गोव्यात इतकी वर्षे अंमलात आहे आणि तरीही गोव्यात काही अडचण नाही तर संपुर्ण देशात हा कायदा लागू व्हायला काहीच अडचण नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com