Suella Braverman Dainik Gomantak
गोवा

Suella Braverman: युकेच्या गृह सचिवांची देखील गोव्यातील जमिन हडपली

सुयेल्ला ब्रेव्हरमॅन यांच्या वडिलांनी केली तक्रार दाखल

Sumit Tambekar

गोवा राज्यात बनावट कादगपत्रांच्या आधारे जमीन हडपल्याचे प्रकार समोर येत आहेत. राज्य सरकारने याबाबतची चौकशी करण्यासाठी गुन्हे अन्वेषण विभागाकडे (SIT ) हे प्रकरण सोपवले आहे. याबाबत आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला असून युकेच्या गृह सचिव सुयेल्ला ब्रेव्हरमॅन यांच्या आसगांव बार्देसमधील वडिलोपार्जित जमिनीवर बनावट कादपत्रांच्या आधारे हडपली असल्याची तक्रार गोवा पोलिसात दाखल झाली आहे.

(goan origin UK Home Secretary Suella Braverman's ancestral land grabbed in Goa)

गोमंतकीय वंशाच्या युकेच्या गृह सचिव सुयेल्ला ब्रेव्हरमॅन यांची आसगांव बार्देसमधील वडिलोपार्जित जमिनीवर खोट्या कागदपत्रांद्वारे कब्जा करण्यात आला आहे. अशी तक्रार सुयेल्ला ब्रेव्हरमॅन यांचे वडील युकेचे रहिवासी क्रीस्टाय सांतानो गोडफ्रे फर्नांडीस यांनी गोव्याच्या पोलीस महासंचालकांकडे केली आहे.

या तक्रारीची प्रत सांतानो यांनी मुख्यमंत्री आणि एनआरआय आयुक्तांनाही दिली आहे. त्यामूळे आता गोव्यातील जमीन हडप प्रकरणावरुन पुन्हा राजकिय खडाजंगी होणार का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याबाबत नुकतीच आपली भुमिका स्पष्ट केली आहे. त्यामूळे या मुद्यावरुन पुन्हा आऱोप- प्रत्यारोपाच्या फैरी झडणार का हे पाहावे लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: शापोरा – हणजूण येथून ११ वर्षीय मुलगा दोन दिवसांपासून बेपत्ता, शोध सुरु

Randeep Hooda At IFFI: बिरसा मुंडांच्या जीवनावर सिनेनिर्मिती व्हावी! अंदमान सेल्युलर तुरुंगात गेल्यानंतर मात्र.. ; रणदीप हुडाने मांडले स्पष्ट मत

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

SCROLL FOR NEXT