महासागरांमध्ये 150 दशलक्ष टनांपेक्षा जास्त प्लास्टिक तरंगत असताना, गोव्याचा किनारा लवकरच मायक्रोप्लास्टिकच्या जाळ्यात फसू शकतो ज्यामुळे केवळ सागरी जीवनच नष्ट होणार नाही. तर मानवी शरीरातही प्रवेश होईल, असे नॅशनल सेंटर फॉर ध्रुवीय आणि महासागर संशोधन (NCPOR) ने म्हटले आहे. ते वास्को येथील दीपविहार उच्च माध्यमिक विद्यालय, विद्यार्थ्यांना केंद्र सरकारने गोव्यात सूरु केलेल्या 'स्वच्छ सागर सुरक्षित सागर' या मोहिमेचा एक भाग म्हणून मार्गदर्शन केले.
(microplastics from waste dumped into oceans can enter food chain ncpor goa vasco)
या कार्यक्रमास नॅशनल सेंटर फॉर ध्रुवीय आणि महासागर संशोधन प्रकल्प शास्त्रज्ञ - मेलेना सोरेस, समुद्री भू-रसायनशास्त्रज्ञ मारिया फर्नांडिस, शास्त्रज्ञ व्ही शक्तीवेल सामी यांची प्रमूख उपस्थिती लाभली. यावेळी तज्ज्ञांनी महासागरात टाकल्या जाणार्या कचऱ्यामुळे निर्माण होणाऱ्या धोक्याने मानव कसा धोक्यात येत आहे, याची माहिती दिली.
मासे, पक्षी आणि इतर सागरी जीवांनी प्लास्टिकचे सेवन करण्यास सुरुवात केल्याने पर्यावरणाची हाणी कशी होत आहे. याची साखळी ही माहित करुन दिली. तज्ज्ञांनी महासागरांच्या प्रदूषणापासून संरक्षण करण्याचे महत्त्व या विषयावर माहिती दिली.
समुद्री भू-रसायनशास्त्रज्ञ मारिया फर्नांडिस म्हणाल्या की “माणसे जगण्यासाठी आणि उपजीविकेसाठी किनारपट्टीवरील संसाधनांवर अवलंबून आहेत. ही स्थिती सुधारली नसल्यास महासागरातील मायक्रोप्लास्टिक लवकरच अन्नसाखळीत प्रवेश करेल असा धोका ही यावेळी सांगितला.
“रस्त्याच्या कडेला कचरा टाकणे, समुद्रकिनाऱ्यांवर अन्नपदार्थांचे डंपिंग आणि इतर अनेक मानवी क्रियाकलापांमुळे प्रचंड प्लास्टिक कचरा निर्माण झाला आहे,” कचरा ढिगाऱ्यााचे सागरी जीवनावर गंभीर परिणाम आहेत. तसेच रस्त्याच्या कडेला टाकलेले प्लास्टिक आणि इतर कचरा पाण्यात जातो तोच कचरा आता समुद्री पर्यावरणास घातक ठरत असल्याचं सांगितले.
शास्त्रज्ञ मेलेना सोरेस यांनी या कार्यक्रमादरम्यान बोलताना प्लास्टिकच्या ढिगाऱ्यामुळे लाखो पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. असे सांगत या कारणाकडे वळताना पक्ष्यांचा श्वासोच्छवासाचा मार्ग आणि पोट यांच्यात प्लास्टिक बिघाड करते आणि यातच त्यांचा मृत्यू होत असल्याचे सांगितले.
मिरामार, बायना, बोगमलो, वेल्साओ आणि कोलवा आता स्वच्छ होणार
या कार्यक्रमादरम्यान बोलताना NCPOR शास्त्रज्ञ व्ही शक्तीवेल सामी यांनी सांगितले की, 17 सप्टेंबर रोजी संपूर्ण भारतभर एक मेगा क्लीन-अप मोहीम आखण्यात आली आहे, जो आंतरराष्ट्रीय किनारी स्वच्छता दिन आहे. ते म्हणाले की, गोव्यात एकाच वेळी पाच समुद्रकिनाऱ्यांवर समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.
समुद्रकिनारी स्वच्छता मोहिमेत भारतीय तटरक्षक दल, मुरगाव बंदर प्राधिकरण, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन आणि इतर संस्था सहभागी होणार आहेत. मिरामार, बायना, बोगमलो, वेल्साओ आणि कोलवा समुद्रकिनाऱ्यांवर ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.