Salcete Dainik Gomantak
गोवा

Salcete: सासष्‍टीचा ‘हात’ काँग्रेस-फॉरवर्डला! पटकावल्‍या 8 जागा; ‘आप’चा एकच उमेदवार विजयी, भाजपचा सुपडा साफ

Salcete zp election result: भरवशाच्या सासष्‍टीतील ९ मतदारसंघांपैकी ७ मतदारसंघांत काँग्रेस तर एका मतदारसंघात गोवा फॉरवर्डचा उमेदवार जिंकून आला.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव : भरवशाच्या सासष्‍टीतील ९ मतदारसंघांपैकी ७ मतदारसंघांत काँग्रेस तर एका मतदारसंघात गोवा फॉरवर्डचा उमेदवार जिंकून आला. या तालुक्‍याने अपेक्षेप्रमाणे काँग्रेस-गोवा फॉरवर्ड युतीला साथ दिली. आम आदमी पक्षाला एकाच मतदारसंघात बाजी मारता आली. विशेष म्‍हणजे या तालुक्‍याने भाजपला तसेच शेवटच्‍या क्षणी युतीतून बाहेर पडलेल्‍या ‘आरजी’ला पूर्णत: नाकारले आहे.

सासष्‍टी तालुक्‍याने या निवडणुकीत काँग्रेसला भक्‍कम साथ दिल्‍याने नुवे, वेळ्‍ळी, दवर्ली, गिरदोली, कुडतरी, बाणावली व नावेली हे सात मतदारसंघ जिंकता आले. काँग्रेसचा सहयोगी पक्ष असलेल्‍या गोवा फॉरवर्डला राय मतदारसंघात विजय प्राप्‍त झाला. कोलवा मतदारसंघांत आम आदमी पक्षाने विजय मिळविला.

मागच्‍या जिल्‍हा पंचायत निवडणुकीत सासष्‍टीतील दवर्ली व गिरदोली या दोन मतदारसंघांत भाजपला विजय प्राप्‍त झाला होता. मात्र यावेळी तेथे या पक्षाला काहीच प्रभाव दाखवता आला नाही. दवर्लीत भाजपचे सत्‍यविजय नाईक यांना काँग्रेसचे फ्‍लोरियान फर्नांडिस यांच्‍याकडून ४६० मतांनी पराभव स्‍वीकारावा लागला, तर गिरदोली मतदारसंघात काँग्रेसचे संजय वेळीप यांनी भाजपचे गोकुळदास गावकर यांच्‍यावर २६०३ एवढ्या प्रचंड मताधिक्क्‍याने विजय मिळविला.

कुडतरीत काँग्रेसच्‍या आस्‍त्रा डिसिल्‍वा २८०९ मतांनी जिंकल्‍या. नुवेत याच पक्षाचे अँथनी ब्रागांझा यांनी ‘आप’चे लुईस बार्रेटो यांच्‍यावर ६८३ मतांनी विजय मिळविला. नावेलीत काँग्रेसच्‍या मलिफा कार्दोज यांनी ‘आप’च्‍या बियात्रिस्‍त फर्नांडिस यांच्‍यावर १३०५ मतांनी, वेळ्‍ळीत काँग्रेसचे ज्‍युलियांव फर्नांडिस यांनी ‘आप’च्‍या इसाका फर्नांडिस यांच्‍यावर १६७६ मतांनी,

राय मतदारसंघात गोवा फॉरवर्डच्‍या इनासिना पिंटो यांनी अपक्ष ज्‍योआना फर्नांडिस यांच्‍यावर १३४१ मतांनी तर कोलवा मतदारसंघात आम आदमी पक्षाचे आंतोनियो फर्नांडिस यांनी अपक्ष उमेदवार नेली रॉड्रिगीस यांच्‍यावर ७३ मतांनी विजय प्राप्‍त केला. बाणावलीत ‘आप’चे जोजफ पिमेंता यांना काँग्रेसच्या लुईझा रॉड्रिगीस यांच्याकडून ६५० मतांनी पराभव स्वीकारावा लागला..

‘आप’चे व्‍हेंझी ‘पास’, सिल्‍वा ‘नापास’

सासष्‍टीत आम आदमी पक्षाने ९ पैकी ८ मतदारसंघांत आपले उमेदवार उभे केले होते. पण प्रत्‍यक्षात कोलवा मतदारसंघ सोडल्‍यास इतर मतदारसंघांत त्यांना यश संपादता आले नाही. ‘आप’चे बाणावलीचे आमदार व्‍हेंझी व्‍हिएगस यांनी आपला एक उमेदवार जिंकून आणला, मात्र वेळ्‍ळीचे आमदार क्रुझ सिल्‍वा यांना आपला उमेदवार निवडून आणता आला नाही. एकंदरीत या निवडणुकीत ‘आप’ला करिश्‍‍मा दाखवता आला नाही.

भाजपच्‍या हाती आला भोपळा

सासष्‍टीतील निदान दवर्ली मतदारसंघात भाजपचे सत्‍यविजय नाईक हे विजयी होतील असा विश्‍‍वास या पक्षाचे कार्यकर्ते व्‍यक्‍त करत होते. पण प्रत्‍यक्षात तेथेही भाजपला अपयशाचा सामना करावा लागला. नाईक यांना ४६० मतांनी पराभव स्‍वीकारावा लागला. हा निकाल लागल्‍यानंतर ‘‘आमच्‍याच काही लोकांनी माझी गेम केली’’ अशी तिखट प्रतिक्रिया सत्‍यविजय नाईक यांनी व्‍यक्‍त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Santosh Trophy 2025: गोव्याने संधी गमावली! संतोष करंडक फुटबॉलमध्ये मुख्य फेरी हुकली; लक्षद्वीपसोबत गोलबरोबरी

Hyderabad Chess Tournament: अमेय अवदीचा चमकदार खेळ! आंतरराष्ट्रीय रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत छाप; 7 विजय व एका बरोबरीची नोंद

Goa Crime: पर्वरीमध्ये 6 वर्षांच्या चिमुकलीचा विनयभंग! स्कूल व्हॅन चालकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; 'POCSO' अंतर्गत गुन्हा दाखल

Tiswadi: तिसवाडीतील मतमोजणी ठिकाणी पेटला वाद! मोबाईल, कॅमेरा नेण्यास मज्जाव; पत्रकार पोलिसांमध्ये उडाले खटके

Goa Winter: राज्यात हुडहुडी कायम! पुढील 4 दिवस कसे राहणार तापमान? वाचा..

SCROLL FOR NEXT