Goa ZP Election Result: युती फिस्कटल्याने विरोधकांना 7 मतदारसंघांत फटका! 21 जागा जिंकण्याची गमावली संधी; 14 जागांवर समाधान

Goa ZP Election Result 2025: चिंबलमध्‍ये भाजप उमेदवाराने ५,७३२ मते घेतली. पण, तेथे काँग्रेस, आरजीपी आणि आपच्‍या उमेदवारांना एकूण ७,१६३ मते मिळाली आहेत.
Goa
GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: जिल्‍हा पंचायत निवडणुकीत आप आणि आरजीपी या दोन पक्षांनी युतीपासून फारकत घेतल्‍याने सहा आणि काँग्रेससोबत युतीत असूनही गोवा फॉरवर्डने उमेदवार दिल्‍याने एका अशा सात जागांवर विरोधकांना पराभवाचा सामना करावा लागला.

निवडणुकीत भाजप–मगो युतीने ३२ जागा जिंकल्‍या, तर काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, आप आणि आरजीपी या पक्षांनी १४ जागा मिळवल्‍या. या सर्व विरोधकांची युती असती, तर त्‍यांना ५० पैकी २१ जागा जिंकता आल्‍या असत्‍या. उत्तर गोव्‍यातील शिवोलीत भाजप उमेदवार ४,९५३ मते मिळवून विजयी झाला.

त्‍या ठिकाणी काँग्रेस, आप आणि आरजीपीच्‍या उमेदवारांना एकूण ५,८१० मते मिळाली आहेत. हणजुणेत विजयी भाजप उमेदवाराला ४,७५४ मते मिळाली. तेथे काँग्रेस णि आरजीपीच्‍या उमेदवारांना ६,८६५ मते मिळाली आहेत. कळंगुटमध्‍ये भाजप उमेदवाराने ५,६४६ मते घेऊन विजय संपादन केला. तेथे काँग्रेस, आरजीपी आणि आपच्‍या उमेदवारांना ८,७२२ मिळाली आहेत.

चिंबलमध्‍ये भाजप उमेदवाराने ५,७३२ मते घेतली. पण, तेथे काँग्रेस, आरजीपी आणि आपच्‍या उमेदवारांना एकूण ७,१६३ मते मिळाली आहेत. दक्षिण गोव्‍यातील रिवणमध्‍ये भाजप उमेदवाराला ६,३२९ मते मिळाली. तेथे गोवा फॉरवर्ड आणि आपने उमेदवार उतरवले होते. या दोन्‍ही उमेदवारांना एकूण ६,७७८ मते मिळाली आहेत. खोला मतदारसंघातील भाजप उमेदवार ५,१०३ मते घेऊन विजयी झाला.

Goa
'भरभरून पाठिंबा दिल्याबद्दल गोव्यातील 'बंधू-भगिनींचे मी आभार मानतो'! जिल्‍हा पंचायत निवडणुकीच्या विजयानंतर PM मोदींची X पोस्ट Viral

तेथे काँग्रेस आणि आपने दिलेल्‍या उमेदवारांना ५,३०० मते मिळाल्‍याचे राज्‍य निवडणूक आयोगाने जारी केलेल्‍या आकडेवारीतून स्‍पष्‍ट झाले आहे. दरम्यान, जिल्‍हा पंचायत निवडणुकीत भाजपला पराभूत करण्‍यासाठी काही महिन्‍यांपूर्वी सर्वच विरोधी पक्षांनी एकत्र येण्‍याचे ठरवले होते. परंतु, प्रथम ‘आप’ने युतीत सहभागी होण्‍यास नकार दिला होता.

Goa
Goa ZP Election Result: जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'! विरोधकांची युती न झाल्यानं फुललं कमळ; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

म्हणून खोर्लीत सिद्धेश नाईकला फायदा

काँग्रेससोबत युतीत असूनही गोवा फॉरवर्डने काँग्रेस उमेदवार असलेल्‍या मोरजी आणि खोर्लीत उमेदवार दिलेले होते. त्‍याचा फटका गोवा फॉरवर्डला बसला. खोर्लीत भाजपच्‍या सिद्धेश नाईक यांनी ५,५९४ मते घेऊन विजय मिळवला. तेथे गोवा फॉरवर्डच्‍या उमेदवाराला ४,७३८ मते मिळाली, तर काँग्रेस उमेदवाराला ४,५३७ मते मिळाली. या दोन्‍ही पक्षांनी खोर्लीत एकच उमेदवार दिला असता, तर सिद्धेश नाईक यांचा निश्‍चित पराभव झाला असता, असे आकडेवारीतून दिसून येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com