ZP Election 2025 Dainik Gomantak
गोवा

ZP Election 2025: फिल्म सिटी, आयआयटीविरोधात भूमिका घेतलेल्या पागींची निवडणूक रिंगणात एंट्री; अपक्ष लढण्‍याची केली घोषणा

Goa ZP Election 2025: लोलयेचे माजी सरपंच शैलेश (पोपनी) पागी यांनी पैंगीण जिल्हा पंचायत मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी भरणार असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली.

गोमंतक ऑनलाईन टीम

काणकोण: लोलयेचे माजी सरपंच शैलेश (पोपनी) पागी यांनी पैंगीण जिल्हा पंचायत मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी भरणार असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली.

पागी म्हणाले की, पैंगीण जिल्हा पंचायत क्षेत्रातील विविध भागातील जमिनींच्या लिलावाचे सत्र सत्ताधाऱ्यांनी सुरू केले आहे. लोलयेतील भगवती पठारावर ‘फिल्म सिटी’ प्रकल्प आणि माड्डीतळप येथील कोमुनिदाद संस्थेची जमीन कृषी कारणांसाठी हडप करण्याचा प्रयत्न होत आहे.

हा कल गावडोंगरी व खोतीगाव क्षेत्रातही दिसत असून, स्थानिक युवकांनी या सर्व प्रकल्पांना विरोध करत जमिनी वाचविण्याची चळवळ उभारली आहे. या युवकांनीच मला निवडणूक लढविण्याची विनंती केली आहे.

यापूर्वी लोलये ग्रामपंचायतीच्या सरपंचपदावर असताना भगवती पठारावरील आयआयटी तसेच सध्या प्रस्तावित फिल्म सिटीला शैलेश पागी यांनी ठामपणे विरोध केला होता. त्यामुळे स्थानिकांचा विश्वास आणि पाठिंबा आपल्याला मिळत असल्याचा त्यांनी दावा केला.

येणाऱ्या शुक्रवारी किंवा सोमवारी उमेदवारी अर्ज सादर करणार आहे. उमेदवारीपूर्वी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली होती. मात्र नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची त्यांची तयारी नसल्याने अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. काही राजकीय नेत्यांचे समर्थन मिळत आहे. - शैलेश पागी, माजी सरपंच (लोलये)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: मैत्रीत 'दगा' की राजकारणाची 'मजा'? भाजपच्या बालेकिल्ल्यात मगोचा शिरकाव; युतीचे समीकरण धोक्यात!

Vaibhav Suryavanshi: 14 वर्षीय वैभवच्या शिरपेचात मानाचा तुरा, राष्ट्रपतींच्या हस्ते 'प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार' प्रदान

VIDEO: कलिंगड ज्यूस 220, बर्गर 500 रुपये... महागडा गोवा पर्यटकांना नकोसा! खुद्द पर्यटकानं व्हिडिओ शेअर करत मांडली व्यथा

नोकरीचं आमिष, वासनेचा खेळ अन् 'ट्रक' घालून हत्येचा प्रयत्न! कुलदीप सेंगरच्या जामिनानं 'न्याय'व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह!- संपादकीय

Bicholim Robbery: भामट्यांचा 'खाकी'वरच डाव, पण 'नव्या'ला 'जुना' नडला! निवृत्त ASI च्या सतर्कतेने तोतया पोलिसांचा बेत फसला; डिचोलीत खळबळ

SCROLL FOR NEXT