Goa Youth Protes Dainik Gomantak
गोवा

Goa Youth Protest: परवानगी नाकारली; निदर्शने केलीच, म्हापशातील ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा

Goa CGP Movement: प्रशासकीय यंत्रणेविरोधात आवाज उठविला. या आंदोलनासाठी आयोजकांनी म्हापसा पोलिस ठाणे आणि स्थानिक पालिकेकडे लेखी अर्ज करून परवानगी मागितली होती.

दैनिक गोमन्तक डिजिटल

म्हापसा: ‘नीट’ परीक्षेतील गैरप्रकार आणि निकालातील कथित घोटाळ्याच्या निषेधार्थ तसेच अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी सायंकाळी म्हापसा येथील लोहिया उद्यानात ‘कॉक्रोच जनता पार्टी’ चळवळीच्या वतीने भव्य व शांततापूर्ण निषेध मोर्चाचे आयोजन केले होते. या आंदोलनात बॉलिवूड अभिनेता अभिषेक बॅनर्जी, अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सुमारे दीड तास चाललेल्या या निदर्शनावेळी लोकांनी विद्यमान प्रशासकीय यंत्रणेविरोधात आवाज उठविला.

या आंदोलनासाठी आयोजकांनी म्हापसा पोलिस ठाणे आणि स्थानिक पालिकेकडे लेखी अर्ज करून परवानगी मागितली होती. मात्र, प्रशासनाकडून अधिकृत परवानगी देण्यात आली नव्हती. तरीही सायंकाळी आंदोलक मोठ्या संख्येने येथील लोहिया उद्यानाजवळ पोहोचले असता, उद्यानाचे मुख्य प्रवेशद्वार बंद केल्याचे आढळले. एरवी हे उद्यान रात्री ९ वाजेपर्यंत खुले असते.

याबाबत निदर्शकांनी पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे विचारपूस केली. काही वेळातच आंदोलकांची गर्दी वाढू लागल्याने प्रशासनाला उद्यानाचे गेट उघडावे लागले. लाऊडस्पीकर वापरण्यास मनाई असल्याने आंदोलकांनी अत्यंत शांततेत आपले निवेदन मांडले. "आम्ही पोलिस आणि पालिकेकडे परवानगीसाठी अर्ज केला होता; पण त्यांच्याकडून काहीच उत्तर आले नाही.

सुरुवातीला उद्यानाचे गेट बंद होते, पण नंतर गर्दी पाहून ते उघडण्यात आले. आम्हाला लाऊडस्पीकरची परवानगी नव्हती, तरीही सहकार्य केल्याबद्दल पोलिस आणि पालिकेचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया गोव्यातील सीजीपी चळवळीचे सदस्य तथा आजच्या आंदोलनाचे संयोजक पूजन मालवणकर यांनी दिली.

हा लढा देशातील युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे. आम्ही सरकारच्या विरोधात नाही. विद्यार्थ्यांना न्याय व दर्जेदार शिक्षण मिळावे, एवढीच आमची माफक अपेक्षा आहे. आमच्या आंदोलनामुळेच सरकारने काही मागण्या मान्य करत सुधारित विधेयकाला मंजुरी दिली आहे. हा युवकांच्या एकजुटीचा मोठा विजय आहे. आम्ही याच देशाचे नागरिक असून, आम्हीही याच सरकारच्या बाजूने आहोत, असे मत सामाजिक कार्यकर्त्या अमरीन शेख यांनी मांडले.

अभिनेता अभिषेक बॅनर्जीही सहभागी

‘गोव्यातील तरुण आता आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरला आहे. आज आपण या अन्यायाविरोधात एकत्र आलो नाही तर युवकांचे भविष्य धोक्यात येईल. माझे गोव्यात घर असल्याने मीही आता अर्धा गोवेकरच आहे. हा आवाज थेट युवकांचा असल्याने नक्कीच न्याय मिळेल. या लढ्याला सर्वांनी पाठिंबा द्यावा’, असे आवाहन बॉलिवूड अभिनेते अभिषेक बॅनर्जी यांनी यावेळी केले.

घोषणांनी दणाणला परिसर

आंदोलनादरम्यान वातावरण तणावपूर्ण बनले होते. आंदोलकांच्या हातात अन्यायाविरोधात भाष्य करणारे बॅनर्स, संदेश देणारे फलक आणि मेणबत्त्या होत्या. उपस्थितांनी ‘वंदे मातरम’, ‘इन्कलाब जिंदाबाद’ आणि ‘भारतमाता की जय’च्या जोरदार घोषणा दिल्या, तसेच ‘हम होंगे कामयाब’ हे गीत गाऊन विद्यार्थ्यांशी कटिबद्धता दर्शविली.

सामाजिक कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती

या आंदोलनात सिसिल रॉड्रिग्ज, फ्रान्सिस कुएल्हो, राहुल म्हांब्रे, सुदीप दळवी, चेतन कामत आणि दुर्गादास कामत यांच्यासह गोव्यातील अनेक मान्यवर सामाजिक कार्यकर्त्यांनी हजेरी लावून पाठिंबा दर्शविला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT