पणजी: ‘‘जेव्हा एखादी स्त्री स्वावलंबी बनते, तेव्हा ती संपूर्ण कुटुंबाला सक्षम करते. त्यामुळे राज्य सरकारने महिला स्वावलंबनावर भर दिला आहे. ‘नारी शक्ती’, ‘युवा शक्ती’ आणि सामूहिक प्रयत्नांतून सरकार ‘स्वयंपूर्ण आणि विकसित गोवा २०३७’च्या ध्येयाकडे वाटचाल करत आहे’’, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.
दोनापावला येथील लोकभवन दरबार हॉलमध्ये आयोजित स्वयंपूर्ण कौशल्य मेळाव्याच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. ‘‘राज्यातील महिला आणि तरुणांना कौशल्य विकास, रोजगाराच्या संधी, आर्थिक मदत आणि उद्योजकतेच्या माध्यमातून सक्षम करण्याच्या उद्देशाने स्वयंपूर्ण कौशल्य मेळाव्याचे आयोजन केले आहे. राज्यातील युवक तसेच महिला स्वयंपूर्ण झाल्या तरच स्वयंपूर्ण गोवा तसेच विकसित गोव्याचे उद्दिष्ट साध्य होणे शक्य आहे. नोकरी, व्यवसायासाठी महिला व युवकांना कौशल्य प्रशिक्षण देण्यास सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे’’, असे मुख्यमंत्री म्हणाले.
सोळा विभागांमार्फत ६० योजना
१६ सरकारी विभागांच्या ६० योजनांच्या माध्यमातून महिलांना कृषी, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन, पर्यटन, आरोग्यसेवा, किरकोळ व्यापार व अन्न प्रक्रिया यांसारख्या क्षेत्रांत संधी आहे. या मेळाव्यात २४ संस्थांच्या माध्यमातून उद्योगाभिमुख प्रशिक्षण अभ्यासक्रम, शिकाऊ उमेदवारीच्या (अप्रेंटिसशीप) संधी, आर्थिक साहाय्य आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा विस्तारण्यासाठी मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जात आहे. त्यामुळे १८ ते ५० वयोगटातील महिलांनी या उपक्रमात सहभागी व्हावे’’, असे आवाहनही त्यांनी केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.