MLA Carlos Ferreira Dainik Gomantak
गोवा

Goa Winter Session: जनतेच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास सरकार घाबरते का? आमदार फेरेरांनी सोडले टिकास्त्र

गोवा विधानसभेचे हिवाळी अधिवेशन चार दिवसात आटोपणार

गोमन्तक डिजिटल टीम

गोवा विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख निश्चित झाली आहे. जानेवारी महिन्यात 4 दिवसांचे होणार आहे. याबाबत माहिती देताना सभापती रमेश तवडकर यांनी पाच वर्षांचीच माहिती मागवता येईल अशी अधिसूचना जारी केली आहे. यावरुन काँग्रेस आमदार ॲड. कार्लुस फेरेरा यांनी गोवा सरकारला फटकारलं

( Goa Winter Session 2022 will be held for four days, MLA Carlos Ferreira criticized the Goa government)

मिळालेल्या माहितीनुसार गोवा विधानसभेच्या तारांकीत प्रश्नांवरुन मागील पाच वर्षांचीच माहिती घेता येणार आहे. यापेक्षा अधिक कालावधीची माहिती मागवता येणार नाही. अशा आशयाची अधिसूचना सभापती रमेश तवडकर यांनी जारी केली आहे. यावर आमदार ॲड. कार्लुस फेरेरा म्हणाले की, एखादा सरकारी प्रकल्प गेल्या 10 वर्षांपासून सुरू असेल, तर त्याची सुरुवातीपासूनची माहिती आमदारांनी का मागवू नये? सरकार जनतेच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास घाबरत आहे का? असा टोला त्यांनी यावेळी लगावला. सरकारला जनतेच्या प्रश्नांची उत्तरे द्यायची नाहीत. म्हणूनच हा सुप्त प्रयत्न सुरु असल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला.

विधानसभेचे हिवाळी अधिवेशन 16 ते 19 जानेवारी

गोवा विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख निच्छित झाली आहे. अधिवेशन 16 ते19 जानेवारी दरम्यान 4 दिवसांचे होणार आहे. गोवा विधानसभा सभापती रमेश तवडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. व यासाठी लवकरच कामकाज सल्लागार समितीची बैठक बोलावली जाईल अशी ही माहिती समोर आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL Mini Auction 2026: धोनीच्या चेन्नईत नव्या दमाच्या खेळाडूंची एन्ट्री! दोन अनकॅप्ड खेळाडूंवर 28 कोटींची उधळण; प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा कोट्यधीश

"लग्न केवळ कागदावर उरलं असेल तर ते तोडणंच बरं!" 24 वर्षांपासून रखडलेल्या घटस्फोटाच्या वादावर सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

IPL Mini Auction 2026: केकेआरचा 'मास्टरस्ट्रोक'! मथीशा पाथिरानाला 18 कोटींत केलं खरेदी; सीएसकेच्या 'बेबी मलिंगा'वर शाहरुखने लावली मोठी बोली

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

IPL Mini Auction 2026: पैशांचा पाऊस! कॅमेरुन ग्रीनसह 'हे' 4 खेळाडू आयपीएल लिलावात मालामाल; मोडले सर्व रेकॉर्ड्स

SCROLL FOR NEXT