MLA Vijay Sardesai Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: गोवा क्रूझ पर्यटन केंद्र बनेल, पण राज्यातील कोळशाचं काय? सोनोवाल यांच्या वक्तव्यावर सरदेसाईंचा सवाल

Goa Cruise Tourism Centre: गोवा हे क्रूझ पर्यटनाचे जागतिक केंद्र बनेल, असे विधान केंद्रीय जहाज बांधणीमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी केले.

Manish Jadhav

गोवा हे क्रूझ पर्यटनाचे जागतिक केंद्र बनेल, असे विधान केंद्रीय जहाज बांधणीमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी केले. मंत्र्यांचे हे विधान स्‍वागतार्ह असले, तरी त्‍यांनी मुरगाव बंदरातील कोळसा हाताळणीबद्दल जे वक्‍तव्‍य केले आहे ते चिंताजनक आहे, असे मत गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी व्‍यक्‍त केले.

यासंदर्भात आज सरदेसाई यांनी प्रसिद्धीस दिलेल्‍या एका पत्रकात मुरगाव बंदर प्राधिकरणातील वाढती कोळसा हाताळणी आणि त्‍यामुळे होणारे प्रदूषण हा 2017 पासूनचा चिंतेचा मुद्दा आहे. या काळात गोव्याने जहाजबांधणी खात्‍याचे तीन वेगवेगळे केंद्रीयमंत्री पाहिले आहेत, तरीही कोणीही कोळसा हाताळणी कमी करण्यासाठी वचनबद्धता दाखवलेली नाही. याउलट 2022 मध्ये, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने जिंदाल उद्योग समूहाच्‍या जेएसडब्‍ल्‍यू कंपनीला 15 हजार मेट्रीक टनापर्यंत कोळसा हाताळणी वाढविण्‍याची मंजुरी दिली आहे आणि जहाजे बंदरात आणण्‍यासाठी चॅनेलची खोली वाढविण्‍यासाठीही परवानगी दिली याकडे त्‍यांनी लक्ष वेधले आहे. यापूर्वी माजी केंद्रीय जहाजबांधणी मंत्री मनसुख मांडविया यांनी एमपीएमध्ये कोळसा हाताळणी कमी करण्याचे आश्वासन दिले होते याकडेही सरदेसाई यांनी लक्ष वेधले.

‘गोवेकरांचा विरोध मावळणार नाही’

केंद्रीय मंत्र्यांनी जेएसडब्‍ल्‍यू कंपनी 18 कोटी रुपये खर्चून घुमट बांधत आहे आणि ते पूर्ण झाल्‍यावर प्रदूषणाचा प्रश्न सुटणार असे म्‍हटले आहे. ही घोषणा केल्‍यानंतर गोवेकरांचा कोळसा हाताळणीला होणारा विरोध मावळेल असे वाटत असेल. यापूर्वी कोळसा हाताळणीचा मुद्दा करून मुरगाव मतदारसंघातून जिंकून आल्‍यानंतर भाजपात प्रवेश केलेल्‍या आमदाराने जशी भूमिका बदलली तशीच लोकही भूमिका बदलतील असे वाटत असेल, तर ते चुकीचे ठरेल. गोवेकर कोळसा प्रदूषणावरील आपली भूमिका कधीही बदलणार नाहीत, असे सरदेसाई यांनी म्‍हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway: वडखळ नाक्याच्या दुरावस्थेविरोधात शेकापचं आंदोलन, मुंबई - गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

हाडं, अंडी, मेणबत्ती लावून शाळेच्या मैदानात ब्लॅक मॅजिक? हळदोणात रात्री बारा वाजता तरुणीला घेतलं ताब्यात

Verca Fire News: '..पतीनेच पेटवली दुचाकी'! वार्कातील आग प्रकरणावरून पत्नीची तक्रार; कौटुंबिक वादातून घटना घडल्याची माहिती

Buimpal: भरवस्तीत चिमुकल्याच्या अपहरणाचा प्रयत्न, हाताचा चावा घेऊन 12 वर्षीय मुलाची सुटका; पोलिसांचा तपास सुरु

Goa Agriculture Ambassador: स्वयंपूर्णतेचा संदेश देणारा वरद ‘कृषिदूत’! गोवा सरकारकडून ॲम्बेसिडर म्हणून निवड; भाजी उत्पादनात प्रगतीचा ध्यास

SCROLL FOR NEXT