Goa Weather Dainik Gomantak
गोवा

Goa Weather: कडक उन्हात पावसाची एन्ट्री; राज्यात पुढील तीन दिवस 'अवकाळी'चे संकट, 'यलो अलर्ट' जारी

Goa Weather Update: गोव्यात सध्या उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत असून तापमानाच्या पाऱ्याने विक्रमी टप्पा गाठला आहे.

Sameer Amunekar

पणजी: गोव्यात सध्या उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत असून तापमानाच्या पाऱ्याने विक्रमी टप्पा गाठला आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असतानाच, हवामान विभागाने आता एक महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यात पुढील तीन दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, यामुळे वातावरणात बदल होण्याची चिन्हे आहेत.

वाढता पारा आणि नागरिकांची ओढताण गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कमाल तापमानात सातत्याने वाढ होत आहे. सोमवारी पणजी आणि आसपासच्या परिसरात कमाल तापमान ३४.२ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले. वाढत्या आर्द्रतेमुळे आणि कडक उन्हामुळे दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

कडाक्याच्या उन्हामुळे केवळ स्थानिक नागरिकच नव्हे तर पर्यटनासाठी आलेल्या प्रवाशांनाही असह्य उकाड्याचा सामना करावा लागत आहे. या उष्णतेमुळे पंखे आणि वातानुकूलित यंत्रांचा वापर वाढला असला तरी, उकाड्यापासून पूर्णपणे सुटका मिळणे कठीण झाले आहे.

हवामान विभागाचा इशारा आणि 'यलो अलर्ट'

गोवा वेधशाळेने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवस राज्यावर पावसाचे सावट असेल. विशेषतः सायंकाळच्या वेळी ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह तुरळक पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

हवामान खात्याने राज्यासाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे. अचानक येणाऱ्या या अवकाळी पावसामुळे तापमानात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता असली, तरी पावसाच्या आधीचा उकाडा अधिकच जाणवणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

या बदलत्या हवामानाचा सर्वाधिक फटका आंबा आणि काजू बागायतदारांना बसण्याची शक्यता आहे. ऐन हंगामात पाऊस पडल्यास पिकांचे नुकसान होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT