

पणजी : पगाराची थकबाकी आणि खाण्यापिण्यावरून निर्माण झालेल्या वादातून साळगाव येथील दुहेरी हत्याकांड घडल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
या प्रकरणातील मुख्य संशयित जगन्नाथ भगत याने आपल्या मालकासह सहकाऱ्याची हत्या केल्याचा आरोप असून, तब्बल पाच महिने फरार राहिल्यानंतर गुन्हे शाखेने त्याला ओडिशातून अटक केली आहे. रविवारी कटक येथून त्याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली.
पोलिस तपासात समोर आले की, मूळचा राउरकेला येथील आणि रायपूर येथे वास्तव्यास असलेला जगन्नाथ भगत हा ‘ओएलएक्स’वरील जाहिरातीद्वारे ऑक्टोबर २०२५ मध्ये पीडितांच्या संपर्कात आला होता. त्यानंतर तो गोव्यात येऊन त्यांच्यासोबत राहू लागला. मात्र, पगाराची थकबाकी, राहण्याची गैरसोय आणि जेवणाच्या व्यवस्थेवरून त्यांच्यात सतत वाद होत होते. याच रागातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे चौकशीत समोर आले आहे.
गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा तपास करताना छत्तीसगड, दिल्ली आणि मुंबईसह विविध ठिकाणी संशयिताचा माग काढला. तसेच ओडिशात कारवाई करून संशयिताला बेड्या ठोकण्यात आल्या.
रक्ताच्या थारोळ्यात आढळले होते मृतदेह
साळगाव येथील मुड्डावाडो परिसरातील एका भाड्याच्या घरात रिचर्ड डिमेलो आणि अभिषेक गुप्ता यांचे मृतदेह ६ नोव्हेंबर २०२५ रोजी रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले होते. तीक्ष्ण शस्त्राने वार करून दोघांचीही हत्या करण्यात आली होती. जॉर्ज नोरोन्हा यांनी तक्रार दाखल केली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.