Goa Weather Update Dainik Gomantak
गोवा

Goa Weather: पारा 33.6 अंशावर… अंगाची लाहीलाही! उष्म्याच्या तीव्र झळांनी गोमंतकीय हैराण

Goa Weather Update: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उष्म्याच्या झळा वाढू लागल्या असून नागरिक उकाड्यामुळे हैराण झाले आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उष्म्याच्या झळा वाढू लागल्या असून नागरिक उकाड्यामुळे हैराण झाले आहेत. बुधवारी कमाल तापमानाचा पारा ३३.६ अंश सेल्सिअसवर पोहोचला, जो मागील दिवसापेक्षा सुमारे १ अंशांनी वाढला आहे.

तापमानात वाढ असली, तरी वाढत्या आर्द्रतेमुळे उष्म्याची तीव्रता अधिक जाणवत आहे. कमाल आर्द्रता ८१ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. पुढील चार दिवसांत कमाल तापमान ३३ ते ३४ अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याची शक्यता असून आर्द्रता ९० टक्क्यांपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्यातील हवामान मुख्यतः कोरडे राहील; मात्र काही भागांत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.

दुपारच्या उन्हापासून दूर राहा

दुपारी १२ ते ४ या कालावधीत उष्म्याच्या झळा अधिक तीव्र असतात. त्यामुळे या वेळेत शक्यतो थेट उन्हात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी उष्माघात टाळण्यासाठी आवश्यक काळजी घ्यावी.

उष्ण व जड पदार्थांचे सेवन टाळून हलका व संतुलित आहार घ्यावा. उष्माघाताची लक्षणे जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असेही सांगण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: युती तुटणार? की वाद मिटणार?

Maina Curtorim Mega Project Protest: सरपंच, सचिवावर कारवाई करा! मायणा-कुडतरी मेगा गृहप्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Goa Mega Project Protest: गावाचे गावपण नष्ट करु नका! दवंडे प्रकल्पाविरोधात स्थानिकांचा मडगाव पालिकेवर मोर्चा; 15 दिवसांत प्रकल्प रद्द करण्याचे निवेदन

CM Janjatiya Maje Ghar Yojana: आदिवासी बांधवांसाठी खूशखबर! ‘मुख्यमंत्री जनजातीय माझे घर’ योजना सुरु; आता तुमचे घर होणार हक्काचे आणि कायदेशीर

Goa Crime: पुराव्यांअभावी तिघे मुक्‍त; मुख्य आरोपी मात्र फरार, मोरजीतील खोत खून प्रकरणाला कलाटणी

SCROLL FOR NEXT