Monsoon Update Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon Update 2023: राज्यात ऑरेंज अलर्ट कायम; पडझडीच्या घटना वाढल्या

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Monsoon Update 2023 कोकण ते केरळ किनारपट्टीदरम्यान निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आणि भारतीय उपखंडाच्या मध्यावरील ऑफशोर ट्रफ्समुळे गोव्यासह कोकण किनारपट्टीत पुढील पाच दिवस ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केल्याने मुसळधार पावसाची शक्यता आहे.

हवामान खात्याच्या वेधशाळेने दिलेल्या अनुमानानुसार, पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी योग्य ती काळजी घेत सतर्क राहावे. राज्यात गेल्या आठवडाभरापासून पावसाने जोर धरला आहे.

तसेच पुढील दोन आठवडे राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात एकूण 84 मि.मी. म्हणजेच 3.30 इंच पाऊस पडला. आतापर्यंत राज्यात एकूण 739 मिलीमीटर म्हणजेच 30 इंच पाऊस पडला आहे.

देशात जुलैमध्ये सरासरीएवढा पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यास 7 जुलैनंतर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.

युवक बचावला

शुक्रवारी रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. शनिवारीही पडझड सुरूच होती. नास्नोळा येथे झाड पडल्यामुळे रामनाथ वायंगणकर हा दुचाकीस्वार जखमी झाला. शिवाय डिचोली, म्हापसा, वाळपई या तालुक्यांमध्ये पडझडीच्या अनेक घटना घडल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St Estevam Accident: नेमकं कार कोण चालवत होतं उलगडणार? 'बाशुदेव'प्रकरणी कार ट्रॅकर आणि पेट्रोल पंप फुटेजमुळे तपासाला वेग

ISL 2024-25: एफसी गोवाच्या निष्प्रभ आणि खराब खेळाची मालिका कायम! सादिकूच्या गोलमुळे सामना बरोबरीत

Valpoi Gram Nyayalaya: आता गाव पातळीवरच न्याय मिळणार! वाळपईत सुरु झाले गोव्यातील पहिले ग्राम न्यायालय

Mulgao Fire Incident: मुळगावात आगीमुळे चार दुचाकींची राखरांगोळी! दारूच्या नशेत कृत्य केल्याचा दाट संशय

Mandovi Accident: मांडवीवरचा अपघात नशेच्या धुंदीत; लायसन्स नसताना दिली रेंटेड गाडी!!

SCROLL FOR NEXT